Saturday, February 8, 2025
Homeक्राईमNashik Crime : बारदान अपहारप्रकरणी एकावर गुन्हा; आदिवासी विकास महामंडळाकडून कारवाई

Nashik Crime : बारदान अपहारप्रकरणी एकावर गुन्हा; आदिवासी विकास महामंडळाकडून कारवाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना (Farmer) बारदान न मिळाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाकडे (Tribal Development Corporation) काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तक्रारींच्या चौकशीअंती जिल्ह्यांतर्गत शहापूर प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी पदनाम प्रतवारीकार दोषी आढळले आहे. यामध्ये तब्बल २५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार संबंधित प्रतवारीवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

- Advertisement -

आदिवासी विकास महामंडळामार्फत दरवर्षी धान (Paddy) खरेदी करण्यात येते. धान खोदी करताना संबंधित शेतकऱ्यांना महामंडळाकडून बारदान उपलब्ध करुन देण्यात येते. करोना काळामध्ये महामंडळाकडे वेळेवर बारदान उपलब्ध नसल्याने खरेदी थांबू नये म्हणून शेतकन्यांकडूनच बारदान खरेदी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. हे बारदान २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांना परत करण्यात आले. तरीदेखील शहापूर उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत किन्हवली केंद्रांकडून बारदान न मिळाल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी दाखल केल्या.

तक्रारदारांच्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर शहापूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत (Shahapur Regional Office) असलेल्या सहा केंद्रांवर ठरवून देण्यात आलेला बारदान आणि तपासणीमध्ये आढळून आलेला बारदाना यांच्यात साधारण अडीच लाख बारदानाची तफावत आढळून आली. बाबर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक यांनी चौकशी समिती गठित केली. समितीसमोर संशयीत प्रतवारीकार समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याने व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये समावेश असलेल्या शासकीय व्यक्तींना देखील नोटीस देण्यात आल्या असून त्यांची देखील ठाणे ग्रामीण पोलीसांमार्फत चौकशी सुरु आहे.

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली. त्यामध्ये तपखवत आढळून आल्यानंतर महामंडळामार्फत दोषीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आणखी काही संशयितांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. चौकशीमध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. शेतकयांनी देखील चुकीचे काही घडत असल्यास तक्रार करावी.

लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्या, नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या