Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाNashik Crime : हिस्ट्रीशिटरांचा उच्छाद; व्यावसायिकांना धाक, गुन्हा नोंद

Nashik Crime : हिस्ट्रीशिटरांचा उच्छाद; व्यावसायिकांना धाक, गुन्हा नोंद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून (Recorder Criminal) नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प येथील व्यावसायिकांना लक्ष करीत त्यांच्याकडील किंमती ऐवज हिसकावून नेण्याचे, धमकावण्यासह खंडणी मागण्याचे प्रकार वाढतच आहेत. नाशिकरोड येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यावर हल्ला करीत त्याचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना बुधवारी (दि.४) पहाटे घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात सलग दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल (Filed Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : मोडाळे ग्रामपंचायतीस स्वच्छ व हरित गाव पुरस्कार

मुशरफ मोनिस जमा खान (३२, रा. देवळाली गाव, नाशिकरोड, मुळ रा. उत्तरप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार, ते बुधवारी (दि.४) पहाटे ६.३० वाजता नाशिकरोड (Nashik Road) येथील नूरी मशिद जवळून बेकरी पदार्थ विक्रीसाठी जात होते. त्यावेळी संशयित दर्शन भालेराव याने मुशरफ यांना अडवून दुचाकीवरून खाली उतरवले. तसेच संशयित राहुल तेलोरे याने मोबाइल हिसकावला तर संशयित भूषण जाधव याने धारदार शस्त्राने मुशरफ यांच्यावर वार करीत दुखापत केली.

हे देखील वाचा : Nashik News : निफाड तालुक्यात अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर होणार परिणाम

दरम्यान, या हल्ल्यामुळे मुशरफ हे जीव वाचवण्यासाठी पळत असताना संशयित वैभव पाटीलने त्यांना चाकू फेकून मारल्याने दुखापत झाली. त्यानंतर चौघांनी परिसरात दमदाटी, शिवीगाळ करीत दुकानचालकांना हत्याराचा धाक दाखवून दहशत केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या काही वेळ आधी चौघांनी शिंदे गावाजवळील पेट्रोल पंपावर शस्त्राचा धाक दाखवून दुचाकींमध्ये इंधन भरत पैसे न देता पळ काढला होता. याप्रकरणीही चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे.

हे देखील वाचा : मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

सराईत गुन्हेगार

पोलिसांच्या माहितीनुसार, राहुल तेलोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर २०२१ मध्ये मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने इतर संशयितांसोबत हातमिळवणी करीत स्वतंत्र टोळी करून व्यावसायिकांना धमकावणे, जबरी चोरी करणे, मारहाण करणे आदी गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याने ते मुजोरी करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...