Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

मविआला मोठा धक्का! विरोधकांनी बहिष्कार टाकलेला असतानाही अबू आझमींनी घेतली आमदारकीची शपथ

केली 'ही' मोठी घोषणा

मुंबई | Mumbai

राज्याच्या विशेष अधिवेशनाला (Convention) सुरुवात झाली असून आमदारांचा शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. २८८ आमदारांपैकी काही आमदार (MLA) आज तर उर्वरित आमदार उद्या शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधीच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग करत ईव्हीएमचा निषेध नोंदवला. तसेच विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज आमदारकीची शपथ न घेण्याची भूमिका घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेत मोठी घोषणा केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : EVM वरून विरोधक कडाडणार; शरद पवार आणि राहुल गांधी उद्या मारकडवाडीला जाणार

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी (Samajwadi Party) जागा सोडल्या होत्या.यात सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबू आझमी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केली. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता.आज रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली.

हे देखील वाचा : Nashik Crime : एमडीमुळे नाशिक पुन्हा चमकले

यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना अबू आझमी (Abu Azmi) म्हणाले की,”मविआचा घटकपक्ष असलेला एक पक्ष म्हणतो की, आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर कायम आहोत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर काम करा, असे कार्यकर्त्यांना सांगितले जाते. ०६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडणाऱ्यांचे अभिनंदन केले जाते. अशा पक्षासोबत समाजवादी पार्टी राहू शकत नाही. त्यामुळे मी मविआसोबत राहीन, असे वाटत नाही. समाजवादी पक्ष सेक्युलर आहे, आम्ही कम्युनल भाषा करणाऱ्या पक्षासोबत कसे राहणार?, असा सवाल अबु आझमी यांनी उपस्थित केला. तसेच मविआचा ईव्हीएम संदर्भातील मुद्दा पूर्णपणे मान्य नसल्याचेही त्यांनी म्हटले. पण निवडणूक आयोगाने ईव्हीएम संदर्भातील संशय दूर करावा, असेही त्यांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या