नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
नाशिकरोड (Nashik Road) येथील गोरेवाडी परिसरात राहणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणाने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी संशयिताविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सोमवारी (दि. २९) सकाळी १०.१५ वाजता पतीसह मुलाला शाळेत सोडून रिक्षाने घरी परतत होती. गोरेवाडी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ रिक्षाचा वेग कमी झाला असता त्याच परिसरातील रहिवासी जयेश केशव थोरात (२३, रा. गोरेवाडी, शास्त्रीनगर) याने रिक्षाजवळ येत महिलेचा उजवा हात पकडला आणि त्यांचा मोबाईल क्रमांक मागितला.
पीडित महिलेने (Woman) दिलेल्या फिर्यादीनुसार, जयेश थोरात हा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत होता. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्यावर पाळत ठेवून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकाराला महिलेने आणि त्यांच्या पतीने विरोध केला असता संशयिताने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून चापट मारत मारहाण केली.
तसेच जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेनंतर पीडित महिलेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार संशयित (Suspect) जयेश थोरातविरुद्ध गुन्हा (Case) नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार झाडे-जाधव करत आहेत.




