Wednesday, July 1, 2026
Homeक्राईमNashik Crime News : वाईन शॉप चालकावर धारदार शस्त्राने हल्ला; पाच लाखांची...

Nashik Crime News : वाईन शॉप चालकावर धारदार शस्त्राने हल्ला; पाच लाखांची रोकड लुटली

मखमलाबाद नाक्यातील घटना, रेकी करून तोंड बांधलेल्या दोघांचा धाडसी दरोडा

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

पंचवटीतील मखमलाबाद नाका परिसरात (Makhmalabad Naka) वाईन शॉप चालकावर धारदार शस्त्राने हल्ला (Attack) करून पाच लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २९) रात्री घडली. या प्रकरणामुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर बबन ठाकरे (वय ७०, रा. मखमलाबाद नाका) यांचे गंगापूर रोडवरील (Gangapur Road) ‘द मदीरा वाईन शॉप’ तसेच दिंडोरी रोडवरील ‘दिंडोरी लिकर वाईन शॉप’ अशी दोन दुकाने आहेत. सोमवारी रात्री दोन्ही दुकाने बंद करून ते दिवसाची जमा झालेली रोकड घेऊन घरी परतले. रात्री सुमारे १०.४५ वाजता त्यांनी घरासमोर वाहन उभे केले. गाडीतून रोकड असलेल्या दोन कापडी पिशव्या घेऊन घराकडे जात असताना तोंड बांधलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केल्याने ठाकरे यांच्या डाव्या गालावर व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी (Suspected) त्यांच्या हातातील दोन्ही पिशव्या जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. या पिशव्यांमध्ये दोन्ही वाईन शॉपमधील प्रत्येकी अडीच लाख रुपये, असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज तसेच एचडीएफसी बँकेची दोन भरणा पुस्तके होती. लूट केल्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, आरोपींनी गुन्ह्यापूर्वी ठाकरे यांच्या हालचालींवर पाळत ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, वाहन उभे करण्याची जागा आणि रोकड घरी आणण्याची पद्धत याची माहिती मिळवून आरोपींनी नियोजनबद्ध पद्धतीने हा दरोडा टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलीस (Police) करीत असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या

व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू –...

0
मुंबई | Mumbai नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी (Trimbakeshwar Temple VIP Darshan) दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक व भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची...