Tuesday, January 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : एक कोटीच्या बदल्यात EVM मॅनेज करून देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल;...

Nashik Crime : एक कोटीच्या बदल्यात EVM मॅनेज करून देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय घडलंय?

चांदवड | प्रतिनिधी | Chandwad

शहरात नगरपरिषद निवडणुकीची (Nagarparishad Election) धामधूम सुरू असून निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना ईव्हीएम मशीनमध्ये (EVM machine) सेटिंग करून नगराध्यक्षपदासाठी ११ हजार २५० मते मिळवून देण्याची ऑफर देत आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा चांदवडमधील एका अपक्ष उमेदवाराने केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी तक्रारीवरून चांदवड पोलिसात (Chandwad Police Station) गुन्हा दाखल केला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये ईव्हीएम तसेच निवडणूक यंत्रणे विषयी विविध शंकाकुशंकेच्या चर्चेला उधाण आले आहे.

YouTube video player

दरम्यान, चांदवड नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी निवडणूक प्रक्रियेत गंभीर गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस प्रशासन व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मतांची (Vote) आकडेवारी निश्चित असल्याचा दावा तसेच एक कोटी रुपयांच्या बदल्यात मते मिळवून देण्याची खुली ऑफर मिळाल्याचा धक्कादायक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

चांदवड पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यात अपक्ष उमेदवार राकेश आहिरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी मोबाईल क्रमांक ८३९०२५११४७ वरून शक्ति विलास ढोमसे या व्यक्तीचा फोन आला. या संभाषणात त्यांनी भाजपाचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार वैभव बागुल यांना निवडणूक निश्चितपणे १३ हजार ६४२ मते मिळणार असल्याची शाश्वती दिली. त्यावेळी आहिरे यांनी मते कशी निश्चित केली अशी विचारणा केल्यानंतर ढोमसे यांनी माझं ईव्हीएम मशीन वाल्यांशी बोलणं झाल आहे असे सांगितले. आपण एक कोटी रुपये दिल्यास आपणास सुमारे ११ हजार २५० मते मिळवून देऊ शकतो अशी खुली ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. सदर प्रकार अंत्यत गंभीर, संशयास्पद असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या अर्जासोबत संबंधित फोन रेकॉर्डिंग व इतर पुरावे पेनड्राईव्ह मध्ये त्यांनी जोडले आहेत. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्याकडे तपास दिला आहे. या प्रकारात शक्ती ढोमसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आहिरे यांनी केलेले आरोप निराधार आहेत.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...