नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road
येथील नवले कॉलनी परिसरात २४ वर्षीय युवकाचा (Youth) धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडली आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, अजय भंडारी रा. विष्णुनगर स्टेशनवाडी सिन्नर फाटा असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. घटनेची माहिती समजताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे (Nashik Road Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, सध्या घटनास्थळी मोठी गर्दी असून खून कोणी केला? व का केला याबाबत निश्चित कारण समजू शकलेले नाही. तसेच पोलिसांनी (Police) पुढील तपास सुरु केला आहे.