Monday, January 12, 2026
Homeक्राईमNashik Crime : नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग; शहरात दोन उपनिरीक्षक लाच घेताना...

Nashik Crime : नाशिकमध्ये खाकी वर्दीला डाग; शहरात दोन उपनिरीक्षक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संशयित फसवणुकीच्या (Suspected Fraud) गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी कंत्राटदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यातील (Mumbai Naka Police Station) दोन उपनिरीक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या दोघेही पसार झाले आहेत.

- Advertisement -

दत्तात्रय एकनाथ गोडे (रा. शकुंतला हाईट, कामटवाडेरोड, सिडको) व अतुल भुजंगराव क्षीरसागर (रा. सिंहगड, शासकीय विश्रामगृह) अशी संशयित उपनिरीक्षकांची नावे आहेत. गडकरी चौकातील शासकीय विश्रामगृहाच्या उपहारगृहचालक पिता-पुत्राने क्षीरसागरमार्फत गोडे याच्याकडे ‘मध्यस्थी’ करून चौघांसाठी लाच स्वीकारल्याचे उघड झाले आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Crime : महाप्रसादावरून वाद, थोरल्यावर वार; नाशकात रक्तरंजित राडा

त्यानुसार, दोघांचा शोध सुरू आहे. रमेश गंभीरराव आहिरे आणि कल्पेश रमेश आहिरे अशी संशयित उपहारगृह चालक पिता-पुत्रांची नावे आहेत. विशेष म्हणजे गोडे व क्षीरसागर हे ज्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, त्याच मुंबईनाका पोलीस ठाण्यात त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) उपअधीक्षक एकनाथ पाटील यांनी फिर्याद दिली आहे. लाचेच्या (Bribe) रकमेची मागणी दोन्ही उपनिरीक्षकांमार्फत उपहारगृह चालक कल्पेश आहिरे याने केली.

मात्र, मूळ तक्रारदार व फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित केतन पवारने लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार लाचेची मागणी होत असल्याचे पडताळणीत समोर आले. पथकाने शनिवारी (दि. १०) रात्री १२ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीत सापळा रचला. त्यावेळी कल्पेशने पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले. ही रक्कम वरील दोघा पोलीस उपनिरीक्षकांसाठीच घेतल्याचे त्याने कबूल केले.

हे देखील वाचा : Nashik BJP Politics : बंडखोरांना भाजपचा दणका; माजी नगरसेवक मुकेश शहाणेंसह ‘यांची’ पक्षातून हकालपट्टी

दरम्यान, ही कारवाई एसीबीचे (ACB) पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरंगे यांच्या निर्देशाने पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्यासह हवालदार योगेश साळवे, दिनेश खैरनार यांच्या पथकाने केली. दोघांच्या निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे. एसीबीच्या पोलीस निरीक्षक पूनम केदार याप्रकरणी तपास करत आहेत.

क्षीरसागर मास्टरमाइंड?

या प्रकरणातील मूळ तक्रारदार केतन भास्करराव पवार हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात फसवणुकीतील संशयित असून कंत्राटदार आहे. देयके काढण्यासाठी तो नेहमीच विश्रामगृहात येत-जात असल्याने आहिरे पितापुत्रांशी त्याची ओळख होती. तेव्हा त्याने दाखल गुन्ह्यातून सुटका करवून घेण्यासाठी उपहारगृह चालकाकडे मार्गदर्शन मागितले. तेव्हा आहिरेने विश्रामगृहातच वास्तव्य करणाऱ्या अतुल क्षीरसागरच्या मैत्रीसह ओळखीचा फायदा घेत केतनला मदत करण्यासाठी मध्यस्थी केली. तेव्हा क्षीरसागरने दत्तात्रय गोडे याला फोनही केला. तर, पवारला जामीन मंजूर करण्यासह मदत करतो म्हणून दोन लाखांच्या लाचेची मागणी करून चौघांनी संगनमताने लाच स्वीकारली.

गृहमंत्री नाशकात अन्..

संविधान आणि कर्तव्याप्रती निष्ठावान राहण्याची शपथ घेऊन खांद्यावर खाकी वर्दीची फीत व दोन स्टार लावून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांनीच सहा आकडी लाच घेतल्याने दलात चर्चा झडत आहेत. विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री नाशिक दौऱ्यावर येण्यास केवळ चौदा तास शिल्लक असतानाच या वर्दीधारींनी लाच घेत पळ काढला.

ताज्या बातम्या

गौतम

Raj Thackeray: मोदींच अदाणींना आंदण; राज ठाकरेंनी थेट गौतम अदाणींचा १०...

0
मुंबई | Mumbaiमुंबई महागनर पालिकेच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दादर येथील शिवतीर्थवर संयुक्त सभा होत...