Sunday, September 29, 2024
Homeक्राईमNashik Crime News : मोबाईल चोरटा जेरबंद; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

Nashik Crime News : मोबाईल चोरटा जेरबंद; आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

मोबाईल दुकानातून (Mobile Shop) चोरी (Thief) करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यास आडगाव गुन्हे शोध पथकाला (Adgaon Crime Squad) यश मिळाले आहे. या संशयिताकडून विविध कंपन्याचे चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव येथील जुम्मा मशीदजवळ मोहसीन याकुब शेख, (वय- २९) यांचे आडगाव येथे रजा इंटरप्राईजेस मोबाईल दुकान आहे. मंगळवार (ता.०३) रोजी सायंकाळी साडे सात ते पाऊण आठच्या दरम्यान रिपेरिंग साठी आलेले तीस हजार रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात (Adgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

तसेच या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिस हवालदार दादासाहेब वाघ व पोलिस अंमलदार बहिकर यांना एक संशयित मोबाईल विक्री करण्यासाठी मेडीकल फाटा या परिसरात फिरत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून संशयित करण उर्फ चिकल्या मुरलीधर बलसाने, (वय १९ , रा. सारिका हॉटेल शेजारी, वसंतदादा नगर, आडगाव शिवार, नाशिक) यास ताब्यात घेतले. या संशयिताची सखोल चौकशी केली असता मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.

हे देखील वाचा : Nashik Crime News : दाेन हत्या उघड; मात्र आराेपी अद्यापही मोकाटच

यांनी बजाविली कामगिरी

दरम्यान, सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ ०१ चे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प‌द्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक  सचिन खैरानार, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, दादासाहेब वाघ, निलेश काटकर पोलिस अंमलदार सचिन बाहिकर, दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, अमोल देशमुख, महीला पोलिस अंमलदार वैशाली महाले यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या