Monday, December 2, 2024
Homeक्राईमNashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

नाशिक | Nashik

शहरात काही दिवसांपूर्वीच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या (Murder) झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाचा आता पुन्हा एकदा नाशिकमधील पंचवटी कारंजा (Panchavati Karanja) परिसरात तरुणाची (Youth) डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : १३ तडीपार गजाआड; चार विशेष पथकांची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल सूर्यवंशी (३२) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.तसेच घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीसांनी (Panchvati Police) घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .

हे देखील वाचा : Nashik Ganeshotsav 2024 : वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा; शिंपी परिवाराने साकारला आकर्षक देखावा

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) एका संशयितास ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून इतर संशयितांचा शोध घेतला आहे. तर ऐन गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) काळातच खुनाची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या