Monday, December 2, 2024
Homeक्राईमNashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

Nashik Crime News : पेठरोडला गोवंश तस्करीच्या संशयातून तिघांवर हल्ला

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

गोवंश तस्करीच्या (Cattle Smuggling) संशयातून म्हशींची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना पेठ रोडवरील (Peth Road) राऊ हॉटेल येथे रोखून दुचाकीने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची घटना सोमवारी (दि.९) रात्री म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून एक गंभीर आहे. याबाबत पोलीसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्ला करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : पंचवटीत तरुणाची हत्या; नाशिक पुन्हा हादरलं

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) उमराळे येथून टेम्पो व पिकअपमधून म्हशींची वडाळा गावाकडे (Wadala Gaon) वाहतूक केली जात होती. या वाहनातील म्हशी वडाळा गावातील गोठ्यात पोहच केल्या जाणार होत्या. सोमवारी (दि.९) रात्री १० वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील जवळील राऊ हॉटेल सिग्नलच्या अलीकडे दुचाकींवर ३० ते ३५ लोकांचा जमाव आला. त्यांनी ही दोन्ही वाहने रोखत वाहनांमध्ये असलेले फहाद चौधरी (रा.बागवानपुरा), हमीद शेख (रा.वडाळा), वाजीद शेख (रा.नाईकवाडीपुरा) या तिघांना खाली ओढून जबर मारहाण केली. या मारहाणीत फहाद हा गंभीर जखमी झाला.

हे देखील वाचा : Nashik Crime News : १३ तडीपार गजाआड; चार विशेष पथकांची कारवाई

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच म्हसरुळ पोलिसांनी (Mhasrul Police) घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांची वाहने येत असल्याचे बघून हल्लेखोर दुचाकींनी फरार झाले. तसेच जखमींना पोलिसांनी तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या