Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : भरदिवसा तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न; Video आला समोर

Nashik Crime : भरदिवसा तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न; Video आला समोर

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

येथील पपया नर्सरी जवळ एका तरुणाचे (Youth) चार ते पाच जणांकडून दिवसाढवळ्या अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयितांनी (Suspected) या तरुणास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावरून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तेजस धाडगे (वय २४ रा.रा. त्र्यंबकराज नगर, ध्रुवनगर, नाशिक) असे अपहरण करण्याचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पपया नर्सरी येथे काल (बुधवारी ) दुपारी अडीचच्या सुमारास हिंद सोसायटी येथे आपला मित्राला चहाच्या टपरीवर भेटण्यास आला होता.

YouTube video player

त्यावेळी याठिकाणी गिरीश शिंगोटे रा.सिंहस्थनगर हा आपल्या चार ते पाच साथीदारांसोबत स्विफ्ट डिजायर गाडी क्रमांक एमएच ०६ ए.एस. ५५१७ या गाडीत तेजस धाडगे यास मारहाण करत मोबाईल ताब्यात घेत अपहरण करून पळून नेत होते. यावेळी त्र्यंबकरोड जवळील शिव हॉस्पिटल जवळ संधी मिळताच तेजस याने गाडीतून पळ काढून पपया नर्सरी पोलीस चौकी (Police Chowki) येथे गेला, त्यामुळे त्याची सुटका झाली.

दरम्यान, यावेळी काही लोकांनी तेजस याचे अपहरण करतानाचा व्हिडीओ काढला होता. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला असून, याप्रकरणी तेजस धाडगे याच्या फिर्यादीवरून गिरीश शिंगोटे, अक्षय पवार, शैलेश कुवरसह त्याच्या मित्रांविरोधात अपहरणाचा गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...