Monday, January 12, 2026
Homeक्राईमNashik Crime : महाप्रसादावरून वाद, थोरल्यावर वार; नाशकात रक्तरंजित राडा

Nashik Crime : महाप्रसादावरून वाद, थोरल्यावर वार; नाशकात रक्तरंजित राडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भंडाऱ्याचा ‘प्रसाद’ घरी आणण्यातून झालेल्या वादात ३० वर्षीय धाकट्याने रक्तरंजित राडा घालून ३२ वर्षीय थोरल्या भावाचा (Brothers) खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना उपनगरच्या बोधले नगरातील सुयोगनगरात शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडली. या प्रकरणी संशयित भाऊ सनी दत्तू बोरसे याला अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

उपनगर पोलिसांच्या (Upnagar Police) माहितीनुसार, योगेश उर्फ बाळा दत्तू बोरसे (वय ३२) असे मृताचे नाव आहे. यासंदर्भाने रेखा दत्तू बोरसे यांनी थोरल्या भावाच्या खूनप्रकरणी धाकट्या भावाविरोधात खुनाची फिर्याद नोंदविली आहे. बोधलेनगरातील आरटीओ कॉलनीतील सुयोगनगरात बोरसे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील रेखा, योगेश व सनी हे भावंड असून मोलमजुरी करुन गुजराण करतात. दरम्यान, शुक्रवारी (दि. ९) सकाळी बोधलेनगरात धार्मिक कार्यक्रमानिमित्त महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

YouTube video player

या भंडाऱ्यात योगेश सहभागी झाला. त्याने तेथून प्रसाद म्हणून ‘पार्सल’ स्वरुपात भंडारा घरी आणला. त्याचवेळी धाकटा भाऊ सनी मद्याच्या नशेत आला. त्याने ‘भंडारा’ घरी आणण्याच्या कारणातून योगेशला सुनावले व वाद घातला. तेव्हा दोघांत कडाक्याचे भांडण होऊन मारहाण (Beating) झाली. यानंतर, कुणीतरी ‘मध्यस्थी’ केल्याने हा वाद काहीसा शमला व सनी पुन्हा घराबाहेर पडला. यानंतर मध्यरात्री दीड वाजता तो पुन्हा मद्याच्या नशेत घरी परतला. त्याने दुपारी झालेल्या भंडाऱ्याची कुरापत काढून योगेशला धारेवर धरले. हा वाद विकोपाला पोहोचला असतानाच, सनीने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जबर मारहाणीत तो जखमी झाला असतानाही पुन्हा दंडुक्याने त्याच्या कपाळावर, पाठीवर हल्ला केला.

दरम्यान, त्यात योगेश जबर जखमी होऊन निपचित पडला. काही वेळाने बहीण रेखाने त्याला उपचारार्थ दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर उपनगर पोलिसांनी सनी बोरसे याला अटक (Arrested) केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. शहरात नववर्षाच्या सुरुवातीनंतर पहिल्याच आठवड्यात दोन खुनाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करत आहेत.

ताज्या बातम्या

Raj Thackeray : अदानींच्या माध्यमातून मुंबई गिळण्याचा भाजपचा डाव; राज ठाकरेंचा...

0
मुंबई । Mumbai आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काल (११ जानेवारी) मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण...