Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : मंत्री छगन भुजबळांच्या निधनाची 'फेक न्यूज'; यूट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा

Nashik News : मंत्री छगन भुजबळांच्या निधनाची ‘फेक न्यूज’; यूट्यूब चॅनेलविरोधात गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते (Ajay Borste) यांच्या मातोश्रींच्या निधनानंतर सहवेदना व्यक्त करतानाच ‘हेल्पलाइन किसान’ या नावाच्या बनावट युट्यूब चॅनेलच्या (You Tube Channel) स्क्रीनवर मंत्री छगन भुजबळ यांच्या निधनाची खोटी माहिती टाकून फेक न्यूज (Fake News) पसरविणाऱ्यावर सायबर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ‘छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन’ या मथळ्याखाली व्हिडिओ एका टीव्ही चॅनेलचा बनावट लोगो वापरून सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आला होता. दरम्यान, शहर आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे अंमलदार सुनील बहरवाल यांच्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियावर पोलिसांकडून ऑनलाईन गस्त करुन आक्षेपार्ह पोस्टवर करडी नजर ठेवली जाते.

YouTube video player

त्यानुसार सर्किंग सुरू असताना, टीव्ही ९ या चॅनेलचा लोगो वापरून छगन भुजबळ यांचे निधन (Death) या मथळ्याखाली व्हिडिओची लिंक निदर्शनास आली. ही लिंक ओपन करून पाहिली असता, त्यात रजनी बोरस्ते यांचे दुःखद निधनाची व त्यांना मंत्री भुजबळ यांनी युट्यूबवर श्रद्धांजली अर्पण केल्याचा व्हाईसओव्हर होता. परंतु संशयिताने मंत्री भुजबळ यांच्या मृत्यूची खोटी पोस्ट व टॅगलाईन वापरून युट्यूबवर शनिवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास व्हायरल केली. ही पोस्ट सुमारे दोन लाख नागरिकांनी पाहिली. त्यामुळे समाजात अफवा पसरून जनक्षोभ उसळण्याची शक्यता होती. तसेच शहराच्या शांततेचा भंग होईल असे कृत्य केले.

त्यानुसार, ‘हेल्पलाईन किसान’ (Helpline Kisan) हे नाव असलेल्या व ते चालविणाऱ्या या युट्युब चॅनेलविरोधात शहर सायबर पोलिसात (Cyber Police) ३५३(१), ३४५ (३), भान्यास ६६ क. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम १०३, भारतीय ट्रेडमार्क कटनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने सायबरचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे, सहायक निरीक्षक सुरेश कोरबू गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

४४७ व्हिडीओ अपलोड

संशयिताने टीव्ही ९ चॅनेलचा नोंदणीकृत लोगोचा विनापरवाना वापर केला आहे. तसेच, ही बातमी टीव्ही ९ चॅनेलने अपलोड केली असे भासविले आहे. त्यानुसार हे बनावट चॅनेल कोण चालवित आहे, याचा शोध सुरु झाला असून त्याने मागील दोन वर्षांपासून याच चॅनेलवर ४४७ हून अधिक व्हिडीओ पोस्ट करून लोड केले आहेत. त्या सर्वच व्हिडीओला आतापर्यंत ३५ लाख ३२ हजार हिट्स मिळाल्याचे दिसते.

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...