Thursday, February 5, 2026
HomeनाशिकNashik Crime : विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींवर गुन्हा

Nashik Crime : विवाहितेची आत्महत्या; सासरच्या मंडळींवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

‘तुला मूलबाळ होत नाहीत’, असे टोमणे ऐकावे लागत असल्यासह सासरच्या जाचास कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार नवीन सिडकोतील एकदंतनगर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) सासरकडील संशयितांवर (Suspected) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisement -

कोमल सचिन मुंडावरे असे आत्महत्या (Suicide) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर, तिचा पती संशयित सचिन मोहन मुंडावरे, सासू मनीषा मोहन मुंडावरे आणि दीर कल्पेश मोहन मुंडीवरे (तिघे रा. महालक्ष्मी प्राईड, एकदंतनगर, उत्तमनगर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सातारा खंडोबा येथील ग्रामपंचायत गल्ली भागात राहणाऱ्या परदेशी कुटुंबातील कोमल हिचा विवाह सन २०१९ मध्ये सचिन मुंडावरे याच्याशी झाला होता.

YouTube video player

तिची आई पुष्पा संजय परदेशी यांच्या फिर्यादीनुसार, कोमलचा विवाह झाल्यानंतर, संसार सुरळीत सुरु असतानाच, काही महिन्यांनी कोमल आणि तिच्या पती, सासू व दिरांत खटके उडू लागले. सन २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत संशयितांनी ‘तुला दिवस राहत नाहीत’ असे बोलून अनेक कारणांतून वाद घातला व शारिरिक मानसिक छळ केला. याच त्रासाला कंटाळून कोमल हिने ३१ मार्च रोजी महालक्ष्मी प्राईड येथील घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यामुळे तिचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत संशयितांवर गुन्हा (Case) नोंदविण्यात आला आहे. तपास महिला उपनिरीक्षक सविता उंडे करत आहेत.

ताज्या बातम्या

चंद्रशेखर

Pune Land Scam: पार्थ पवारांना अद्याप दिलासा नाहीच; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...

0
मुंबई | Mumbaiपुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लिनचीट देण्यात येणार आल्याच्या बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. पुढच्या आठवड्यात विकास...