Friday, April 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : संरक्षण दलाच्या CGDA मध्ये भ्रष्टाचार; सीबीआय-एसीबीचे नाशिक, नागपूरात छापे

Nashik Crime : संरक्षण दलाच्या CGDA मध्ये भ्रष्टाचार; सीबीआय-एसीबीचे नाशिक, नागपूरात छापे

पंधरा संशयितांवर गुन्हे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भारतीय संरक्षण दलाच्या (Indian Defence Force) संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालयांतर्गत (सीजीडीए) नाशिकमधील (Nashik) रक्षा लेखा संयुक्त नियंत्रण कार्यालयासह इतर केंद्रीय कार्यालयातील संशयित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने भ्रष्टाचार (Corruption) केल्याचे उघड होत आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) मुंबई पथकाने केलेल्या तपासात ही बाब उघड झाली असून सहा अधिकाऱ्यांसह इतर नऊ संशयितांविरुद्ध अकरा गुन्हे नोंदवले आहेत. विशेष म्हणजे तपास पथकाने नाशिकसह अहमदाबाद, नागपूर येथील संशयितांच्या घरावर छापे (Raid) टाकून कारवाई केली आहे.

- Advertisement -

ओझर (Ozer) येथील एचएएल, देवळालीतील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशनसह अन्य संरक्षण दलात कार्यरत लष्करी जवानांच्या वेतनासह भत्त्यांमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचे कारवाईतून समोर येते आहे. सीबीआय एसीबीच्या मुंबई पथकाने (Mumbai Team) नाशिकच्या आर्टिलरी व आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील लेखापरीक्षक संशयित नवीन कुमार मीना, अजय कुमार, सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी अनुप कुमार उर्फ पटेल, अश्विनी कुमार पांडेय यांच्याविरुद्ध एक गुन्हा नोंद केला आहे तर, ओझर येथील ‘एओजीई’ कार्यालयातील लेखापरीक्षक संशयित विकास कुमार मीना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

तसेच आर्टिलरी व आर्मी एव्हिएशन सेंटरच्या वेतन आणि लेखा कार्यालयातील (ओआरएस) लेखापरीक्षक संशयित मोहित स्वामी यांच्याविरुद्धही गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यांतील पाच संशयितांसह (Suspected) उर्वरित अज्ञात नऊ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. संरक्षण लेखा महानियंत्रक कार्यालय (सीजीडीए), वेतन व लेखा कार्यालय (ओआरएस), आर्टिलरी व आर्मी एव्हिएशन सेंटर (एएसी) या यंत्रणेतील काही अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचे सीबीआय एसीबीच्या तपासात उघड होत आहे.

सीबीआयला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘ओआरएस’ व ‘एएसी’ येथील कार्यालयांत अचानक व्हिजीट करुन तपासणी करण्यात आली. त्यावेळी ‘सीजीडीए’ दिल्ली येथील सूचनेनुसार प्रिन्सिपल कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स (आर्मी), पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष सीबीआय (CBI) पथकाद्वारे ही तपासणी केली. त्यावेळी संशयितांनी लष्करातील कर्मचाऱ्यांचे विविध स्वरुपाचे वेतन बँकेत जमा करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार करण्यासह लाचखोरी केल्याचे समोर आले.

दरम्यान, गंभीर बाब म्हणजे, संशयितांचे लष्करी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तिंसोबतचे ‘व्हॉटसप चॅट’ देखील समोर आले आहे. या प्रकरणांत (Case) पथकांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १७३ अन्वये गुन्हे नोंदविले आहेत.

प्रकरण काय?

संशयित मोहित स्वामी यांच्या व्हॉटसॲप चॅटनुसार वेतनासंदर्भात प्रलंबित दावे मार्गी लावण्यासाठी एका ‘पूनीया सर’ नावाच्या क्रमांकावरुन १ ऑक्टोबर २०२४ रोजी १३ हजार रुपये, २ सप्टेंबर २०२४ रोजी ८ हजार शंभर रुपये, ३ ऑगस्ट २०२४ रोजी साडेपाच हजार रुपये असे २६ हजार ६०० रुपये ‘यूपीआय’ द्वारे जमा झाले आहे. ‘पूनीया सर’ मार्फत अनेकांकडून त्याने पैसे उकळल्याचा संशय असल्याचे फिर्यादित नमूद आहे.

दृष्टीक्षेत्रात

■ १३ नोव्हेंबर २०२४ रोजी दोन पथकांद्वारे संयुक्त तपासणी.
■ ५ डिसेंबर २०२४ रोजी चौकशी पूर्ण.
■ सीबीआय एसीबीच्या अधीक्षकांकडे चौकशी अहवाल सादर.
■ एप्रिल २०२५ रोजी मुंबईत संशयितांविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद.
■ वीस हजार ते सात लाख तीस हजारांपर्यंत भ्रष्टाचार व लाचखोरी झाल्याचा संशय.

लष्करी जवान व कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात लाचखोरी करणाऱ्यांमध्ये पंधरा संशयितांचा समावेश आहे. त्यांच्या नाशिक, मुंबई, अहमदाबाद, नागपूर व लखनऊ येथील घरांची झडती घेतली. तेथे संशयास्पद कागदपत्रे हाती लागली असून, जप्त केली आहेत. त्यासंदर्भात सखोल तपास सुरु आहे.

  • रणजितकुमार पांडेय, उपअधीक्षक, सीबीआय-एसीबी, मुंबई

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...