नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तडीपार (Tadipar) केल्यानंतरही विनापरवानगी शहरात फिरणाऱ्या १३ तडीपारांना एकाच दिवशी शहर पोलिसांनी (City Police) पुन्हा ताब्यात घेतले आहे. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद या सण उत्सवाच्या कालावधीत कोणताही गंभीर गुन्हा घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची (Criminal) शोध मोहिम राबवली. त्यात हे तडीपार गुन्हेगार आढळून आले आहेत.
हे देखील वाचा : Nashik Crime News : मनी लॉन्ड्रिंगच्या धाकाने गमावले सात काेटी; अटकेची दाखविली भिती
शहरात गणेशोत्सव (Ganeshotsav) व आगामी काळात कोणतेही गंभीर गुन्हे घडू नये यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी पोलिसांना खबरदारी घेण्यास सांगितले आहेत. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा व इतर पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी करून त्यांची शोधमोहिम सुरु केली आहे. तसेच टवाळखोरांवरही कारवाई सुरु आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही संशयितांना गणेशोत्सव काळात विघ्न नकाे म्हणूण शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार केले आहे.
हे देखील वाचा : नाशिक जिल्ह्यातील ‘इतक्या’ उमेदवारांना शासनाच्या ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमाच्या माध्यमातून मिळणार रोजगार
दरम्यान, शनिवारी (दि.७) रोजी दिवसभर राबवलेल्या कारवाईत (Action) पोलिसांनी शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेल्या १३ गुन्हेगारांना पकडले. त्यांना पकडून त्यांच्याविराेधात तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार भद्रकाली, म्हसरुळ, मुंबईनाका, पंचवटी,अंबड, सरकारवाडा व सातपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून १३ तडीपारांना पकडले असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. या माेहिमेसाठी गुन्हे शाखेतर्फे ४ अधिकारी व २२ अंमलदारांची ४ शोध पथके नेमण्यात आली आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : दहशत पसरवणारे दोन संशयित ताब्यात; आडगाव गुन्हे पथकाची कामगिरी
हे आहेत तडीपार
चुंचाळे येथील रहिवासी गुरुदेव उर्फ गोपी बलदेव देवल, पंचवटीतील अनिल दत्तू पवार, भारतनगर येथील अमन खालीद खान, चौकमंडई येथील विकार मोहमंद शेख, कॅनडा कॉर्नर येथील केविन विवेक आसर, पंचशिलनगर येथील शौकत सलीम शेख व आरबाज उर्फ सोनू रफीक बेग, सहवासनगर येथील किरण सुभाष भामरे, रोहित योगेश पगार, नानावली येथील असिफ उर्फ काळ्या ईस्माईल शेख, भारतनगर येथील अमन खालीद खान, म्हसरुळमधील जुई नगर येथील अमोल उर्फ नान्या किशारे फल्ले, स्नेहनगर येथील सुजित उर्फ चंग्या भास्कर पगारे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा