Monday, February 23, 2026
Homeक्राईमNashik Crime : उसाचा रस विकताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत दहावीच्या...

Nashik Crime : उसाचा रस विकताना काळाचा घाला; भरधाव कारच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वडिलांच्या हातगाडीवर रस विक्रीत मदत करणाऱ्या पंधरा वर्षीय मुलाचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू (Death) झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २२) दुपारी पेठरोडवरील तवली फाटा येथे घडली. मयूर सुरेश भोये (वय १५, रा. लक्ष्मणनगर, तवली फाटा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

- Advertisement -

रविवारी सुटीचा दिवस असल्याने सायंकाळी चारच्या सुमारास मयूर हा वडिलांसोबत रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत उसाचा रस तयार करण्याच्या कामात मदत करत होता. याचवेळी भरधाव कारने (एमएच १५ केके ६४६४) त्याला जोरदार धडक दिली. धडकेत मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोळ्यांसमोर मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्याने वडिलांनी आक्रोश केला. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, अपघातानंतर कारचालक पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, जवळील एका हॉटेल व्यावसायिकाने तत्परता दाखवत त्याला अडविले.

YouTube video player

दरम्यान, मयूरच्या वडिलांनी (Father) रिक्षा थांबवून जखमी मुलाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयातील वडिलांच हंबरडा पाहून उपस्थितांच्य डोळ्यांत पाणी आले. घटनास्थळी उपनिरीक्षक गजानन जोशी व पथकाने धाव घेत कारचालकाला ताब्यात घेतले. मयूर इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता आणि त्याची परीक्षा सुरू होती. उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळविण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. मात्र, एक क्षणात नियतीने त्याचे आयुष्य हिरावून नेले. कारचालक मद्यधुंद होता की नाही, यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल प्रलंबित आहे. म्हसरूळ पोलिसात (Mhasrul Police) गुन्ह नोंदविण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रातील गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेच्या पेचप्रसंगामुळे...