नाशिक | Nashik
सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) गेल्या काही महिन्यांत शंभरहून अधिक नाशिककरांचे तब्बल ४५ कोटी रुपये उकळून गंडवले आहेत. नागरिकांशी (Citizen) संपर्क साधून त्यांना आमिष दाखवून, हाऊस अरेस्टची भीती आणि शेअर ट्रेडिंगच्या नफ्याबाबत सांगून ही आर्थिक फसवणूक (Fraud) केली.
हे देखील वाचा : Maharashtra Weather Update : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik City Cyber Police Station) दाखल गुन्ह्यांनुसार ७१ घटनांमध्ये नाशिककरांना ४४ कोटी ५१ लाख रुपयांचा गंडा घातला आहे.सर्वाधिक फसवणूक शेअर मार्केटमध्ये (Stock Market) गुंतवणूक (Investment) केल्यास कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून करण्यात आली आहे. त्या खालोखाल नोकरी देण्याचे आमिष दाखवून आणि तसेच मनी लॉडिंग किंवा अंमली पदार्थ वाहतुकीत तुमचे नाव आल्याची भीती घालून नागरिकांना गंडा घातला आहे.
हे देखील वाचा : नाशकातील चौघांना लाखो रुपयांचा गंडा
शहरातील वृद्ध नागरिक, वेगवेगळे नोकरदारवर्ग व लक्ष्य करून चोरटे आमिष दाखवून किंवा भीती घालून गंडा घालत आहेत. १ जानेवारी ते २१ सप्टेंबर या कालावधीत सायबर पोलीस ठाण्यात ७१ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक २९ गुन्हे शेअर मार्केटचे आमिष दाखवून फसवल्याप्रकरणी (Fraud) आहेत. तर टीप लाइन पद्धतीने किंवा सोशल मीडियावरून विनयभंग किंवा पाठलाग केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात ९ गुन्हे दाखल आहेत. फसवणुकीचा हा आकडा याहून अधिक असून गुन्हे दाखल न झाल्याने ते अद्याप उघड झालेले नाही.
हे देखील वाचा : “आधी भाजप अजित पवारांचा काटा काढणार, नंतर शिंदे गटाचा…”, संजय राऊतांचा खळबळजनक दावा
गुन्ह्यांची उकल बारगळली
सायबर फ्रॉडचे जाळे आंतरराष्ट्रीय असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. फसवणुकीचा पैसा परदेशात जात असल्याचेही कळते. नागरिकांची फसवणूक करणारे सामान्य, अज्ञान व्यक्तींचे बँक खाते भाडेतत्वावर घेत त्या खात्यात पैसे घेत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार अद्याप समोर आलेले नाही. काही क्षणात फसवणूक होऊन पैसे काढले जात असल्याने गुन्हेगारांची साखळी समोर येत नाही, तसेच, तक्रारही वेळेत येत नसल्याने त्यांना पकडण्यासाठी सायबर पोलिसांनाही अडचणी येत असल्याचे दिसते. तर, आतापर्यंत सर्वच गुन्ह्यांची पूर्णतः उकल झालेली नाही.
फसवणुकीत लूट (कंसात दाखल गुन्हे)
गुन्ह्याचा प्रकार | फसवणुकीची रक्कम |
शेअर मार्केट गुंतवणूक (२९) | २३, ७०, २८, ६५९ |
डीजिटल अरेस्ट (९) | १४,२९,८४,३८३ |
जॉब फ्रॉड (५) | २,१२,२८,६०२ |
ऑनलाइन खरेदी (३) | १,७१,०८,१८५ |
क्रेडीट-डेबीट कार्ड (२) | १,०१,५३,५१९ |
वेबसाईट, जाहिरात (३) | ५८,९३,८८० |
एनी डेस्क अॅप (४) | ३६,७६,३२२ |
कुरीअर स्कॅम (२) | ३५,७४,८०६ |
एमएलजीएल (१) | १६,४७,७५९ |
ओएल एक्स (१) | १०,१५,४०५ |
ओटीपी (२) | ६,००, ००० |
फ्रॉड कॉल (१) | २, ७१, ०७८ |
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा