Friday, October 18, 2024
Homeक्राईमNashik News : 'होम अरेस्ट'ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर

Nashik News : ‘होम अरेस्ट’ला अटकाव; मोबाईलमध्ये फीचर

'बोथ' कॉलिंगमार्फत सर्वाधिक फसवणूक

नाशिक | भारत पगारे | Nashik

सामान्य नागरिकास व्हिडीओ (Video) तसेच व्हॉट्सॲप कॉल करुन सायबर चोरटे पोलीस निरीक्षकाच्या वेशात समोर येतात. बनावट वॉरंट आणि ड्रग्ज प्रकरणात ‘तुमचे आधारकार्ड व मोबाईल पुरावे’ मिळाल्याचे सांगून डिजिटल होम अरेस्ट (Detention to Home Arrest) करतात. त्यातून उकळून फसवणूक करुन नंबर बंद करुन ठेवतात. मात्र, आता या स्वरुपाच्या फसवणुका टाळता येणे आपल्याला सहज शक्य आहे. कारण, आपल्या मोबाईलमधील केवळ एक फीचर ‘ऑन’ केल्यास आपल्याला कुठलाही संशयास्पद कॉल येणार नाही. त्यामुळे अशा ऑनलाइन फसवणुकांना कोणीही बळी पडणार नाही, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) करणाऱ्या सायबर हॅकर व चोरट्यांनी (Theives) शहरातील नागरिकांना चालू वर्षात सुमारे ४६ कोटींचा गंडा घातला आहे. त्यात भामट्यांनी नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी सर्वाधिक व्हॉट्सॲप कॉल आणि स्काईपचा वापर केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ ही सेटींग कार्यान्वित करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Nashik Cyber Police Station) आयटी ॲक्टअन्वये ८१ गुन्हे दाखल आहेत. त्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जादा परतावा मिळण्याचे अमिष दाखवून, तुमचे आधार व मोबाईल क्रमांक दहशतवादी कारवायांसाठी वापरले आहे, तुम्ही कुरिअरमध्ये ड्रग्ज पाठवले किंवा आढळल्याची भीती दाखवणे यासह बँक खात्यांमार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे भासवून सायबर चोरटे व बनावट इंडी, सीबीआय, क्राईम ब्रांचचे अधिकारी पुढील कारवाई टाळण्यासाठी डिजिटल होम अरेस्ट करून धमकी देतात.

हे देखील वाचा : Nashik Crime News : छोटी भाभी ड्रग्ज प्रकरण; शेकडो कॉल्सचे संभाषण उजेडात

संबंधित घाबरल्याचा विश्वास पटताच त्याला दिलासा देऊन विविध बँक खात्यात (Bank Account) पैसे भरण्यास सांगून कोट्यवधी रुपये उकळतात. अशा स्वरुपाचे १५ ह्र अधिक गुन्हे शहर हद्दीत घडले आहेत. दरम्यान, व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकांवरून येणाऱ्या कॉल्समुळे सायबर फसवणुकीच्या प्रकरणांत चिंताजनक वाढ झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि तंत्रज्ञानाची किचिंतही जाण नसलेल्या नागरिकांकडून अनावधानाने हे कॉल रिसिव्ह केले जातात. त्यातून पुढे गुन्हा घडण्यास सुरुवात होते.

असे होईल संरक्षण

‘सायलन्स अननोन कॉलर्स’ ही सेटिंग येणाऱ्या प्रत्येक कॉल्सवर अधिक गोपनीयता आणि नियंत्रण देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही सेटिंग कार्यान्वित केल्यास स्पॅम, फसवणूक, आणि अनोळखी व्यक्तींकडून येणारे कॉल आपोआप फिल्टर करण्यास मदत होते. ज्यामुळे आपले तांत्रिक संरक्षण वाढते. हे कॉल्स फोनवर वाजणार नाहीत, पण ते महत्त्वाचे असतील तर तुमच्या कॉल लिस्टमध्ये दिसतील, असे शहर पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे भामट्यांशी संपर्क न झाल्यास फसवणूक टळण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने पोलिसांनी ‘सायलन्स अननोन कॉलर्स’ची सुविधा ॲक्टिव्ह करण्याचे आवाहन केले आहे.

असे करा सिक्युरिटी फीचर ऑन

१) व्हॉट्सॲपच्या सेटिंग पर्यायावर क्लिक करा.
२) ‘प्रायव्हसी’ या पर्यायावर किल्क करा.
३) यानंतर ‘सायलेन्स अननोन कॉलर्स’ ऑप्शन दिसेल.
४) त्यावर क्लिक करुन ऑन करा

३६ कोटी लाटले

नाशिक शहरात दाखल सायबर गुन्ह्यांनुसार ४६ कोटीपकी सुमारे ३६ कोटी रुपये केवळ शेअर मार्केटचे आमीष व हाऊस अरेस्टची मिती घालून उकळण्यात आले आहेत. त्यातच फसवणूक झालेले तक्रारदार तातडीने तक्रार करीत नसल्याचे समोर आले आहे. पैशांचा माग काढत ते वाचवण्यात ही पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र आहे. तक्रार मिळेपर्यंत चोरट्यांची साखळी काही तासांत खात्यांमधून पैसे काढून पुढील शेकडो बैंक खात्यात वर्ग करतात. त्यामुळे नागरिकांना आपले पैसे परत मिळण्यात अडचणीचे ठरते. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या