Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik Crime News : छोटी भाभी ड्रग्ज प्रकरण; शेकडो कॉल्सचे संभाषण उजेडात

Nashik Crime News : छोटी भाभी ड्रग्ज प्रकरण; शेकडो कॉल्सचे संभाषण उजेडात

इरफानकडून अर्थपुरवठा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वडाळागावातील छोटी भाभीच्या (Chhoti Bhabhi) एमडी ड्रग्ज (MD Drugs) तस्करी व विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. छोटी भाभी ऊर्फ नसरीन हिला इरफान शेख ऊर्फ चिपड्या हाच अर्थपुरवठा (Money) करत असल्याचे समोर आले आहे. तांत्रिक विश्लेषणात छोटी भाभी, तिचा पती व इरफानचे तब्बल शेकडो कॉल्स झाले असून तोच नाशिकच्या एमडी ड्रग्जचा मास्टरमाईंड असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात इरफान कुणाचा ‘सपोर्ट’ घेऊन हे रॅकेट चालवायचा यादृष्टीने तपास केला जात आहे.

- Advertisement -

 हे देखील वाचा : Nashik Crime News : किर्तनकारास मारहाण करून लुटले

नाशिक शहरासह (Nashik City) आजूबाजूला मॅफेड्रॉन (एमडी) तस्करीसह विक्री करणाऱ्या ‘छोटी भाभी’च्या गुन्ह्याचा तब्बल वर्षभराने तपास सुरू झाला. त्यामुळे शहराला ड्रग्जच्या खाईत लोटणाऱ्या या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून अटकेतील चिपड्या हा एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या विशेष मर्जीतील असल्याचे उघड झाले आहे. याच पाठिंब्यासह पॉवरवर त्याने एमजी ड्रग्जचे कार्टेल आणि अन्य कारनामे सुरू ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे.

 हे देखील वाचा : Hiraman Khoskar : “पहिल्या यादीत मला उमेदवारी न दिल्यास…”; शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमदार खोसकरांचा काँग्रेसला इशारा

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी डिसेंबर २०२३ मध्ये आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ड्रग्जमाफिया ललित पानपाटील व ‘छोटी भाभी’ प्रकरण चर्चेत होते. त्याचवेळी कर्णिक यांनी शहरातील सर्व गोदामे, पानटपऱ्या, अंमली पदार्थ विक्री व बाळगणाऱ्या व्यक्तींच्या याद्या करून धाडसत्र राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिक ‘एनडीपीएस’ने एमडी व गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांसह परजिल्ह्यातील ‘डिलर्स’चा समावेश उघड झाला होता. मात्र छोटी भाभी प्रकरणातील तपासात एनडीपीएस पथकास महत्त्वाचे इनपूट मिळाल्याने त्यांनी लक्ष केंद्रित करून जप्त केलेल्या मोबाईलचे (Mobil) तांत्रिक विश्लेषण केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंग आणि वर्क फ्रॉमचे आमिष दाखवून ३७ लाख उकळले

त्यात सीडीआरनुसार सर्वप्रथम करण सोनटक्के (रा. नाशिकरोड) या ड्रग्ज पेडलरचा सहभाग उघड होऊन २ ऑक्टोबर रोजी सिन्नर येथून अटक केली. त्याने ड्रजच्या धंद्यात इरफानचे नाव उघड केले. त्यालाही अटक करण्यात आली. पुढील तपासात इरफानचे छोटी भाभीसह तिचा पती, करण सोनटक्के यांना ५०० पेक्षा अधिक फोन कॉल करून आर्थिक व्यवहार, क्रूज तस्करी, विक्रीसंदर्भात संभाषण केल्याचे समोर आले. सध्या करण आणि चिपडचा हे ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे सखोल तपास सुरू आहे. त्यात इतर संशयितांचा (Suspect) सहभाग असून त्यांनाही अटक केली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक माहितीसह पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.

हे देखील वाचा : Nashik News : काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; निरीक्षकांनी घेतल्या मुलाखती

छोटी भाभीला रसद, सुरक्षाकवच

इरफान याचे सर्वात जास्त संभाषण छोटी भाभीशी झाले आहे. या प्रकरणात तेव्हापासून वसीम, छोटी भाभी व इम्तियाज कारागृहात आहेत. उर्वरित संशयित जामिनावर बाहेर असून त्यांची ‘एनडीपीएस’कडे हजेरी सुरू आहे. तत्पूर्वी इरफान हा छोटी भाभीला मुंबईतून ड्रग्ज नाशकात आणल्यानंतरची सर्वच मदत करून तिला सुरक्षाकवच पुरवत होता. तसेच तिच्या वारंवार संपर्कात राहून पैशांचा पुरवठा करत असताना तिच्या धंद्यात कुठलीही कायदेशीर अडचण येऊ नये, यासाठी तिची पाठराखण करत होता. तर इरफान हा वडाळ्यासह शहरातील काही भागातून पैशांचे कलेक्शनदेखील करायचा हे उघड झाले असून त्याने हे कलेक्शन कोणासाठी केले याचा सखोल तपास सुरू आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या