Tuesday, January 20, 2026
HomeनाशिकNashik Crime : तळहातावर 'आय लव्ह यू मॉम-डॅड' लिहून दिव्यांग युवतीने संपवलं...

Nashik Crime : तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ लिहून दिव्यांग युवतीने संपवलं जीवन; नेमकं कारण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून २१ वर्षीय दिव्यांग युवतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि.१८) गंगापूर रोडवरील ध्रुवनगरात घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून तिच्या आत्महत्येचे (Suicide) नेमके कारण समोर आलेले नाही. दीक्षा दत्तू त्रिभुवन (रा. शिल्पा आनंदवन, क्रीडांगणाजवळ) असे मृत तरुणीचे नाव आहे.

- Advertisement -

स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू असलेली दीक्षा कुटुंबीयांसाठी आशेचा किरण होती. मात्र रविवारी (दि. १८) सायंकाळी सहा वाजता तिने राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. कुटुंबीयांना ही बाब लक्षात येताच तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू (Death) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ती जन्मतःच मूकबधीर होती. शहरातील एका दिव्यांग विद्यालयात शिक्षण घेत होती, असे पोलिसांनी सांगितले.

YouTube video player

दरम्यान, गंभीर बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी तिने तळहातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असे लिहून जीवन संपवल्याचे शवचिकित्सेतून समोर आले आहे. हे दृश्य पाहून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. या भावनिक निरोपामुळे तिच्या मनातील अस्वस्थता आणि वेदना अधोरेखित झाल्या, मात्र तिने हे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिव्यांग असूनही जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या या मुलीचे (Girl) असे अकाली जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. दीक्षाच्या पश्चात आई, वडील व भाऊ असून तिघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत पाटील करत आहेत.

ताज्या बातम्या

नितीन

BJP New President: भाजपात ‘नव्या’ पर्वाला सुरवात; नितीन नबीन भाजपचे १२...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची निवड झाली आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधिकृतपणे...