Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : पंचवटीत टोळी युद्धाचा थरार; पूर्ववैमनस्यातून युवकावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

Nashik Crime : पंचवटीत टोळी युद्धाचा थरार; पूर्ववैमनस्यातून युवकावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक

नाशिक | Nashik

पंचवटी परिसरातील (Panchvati Area) पेठरोडवरील (Peth Road) राहुलवाडीत मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून एकावर गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर विठ्ठल जाधव असे गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे (Youth) नाव असून, तो एका खंडणी प्रकरणातील संशयित तसेच उघडे गँगचा कट्टर समर्थक असल्याचे समजते. जाधव हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत एका ओट्यावर बसलेला असताना याच परिसरात राहणाऱ्या विकी उत्तम वाघ आणि विकी विनोद वाघ या दोघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

YouTube video player

या गोळीबारात सागर जाधव (Sagar Jadhav) याच्या गालातून गोळी आरपार गेली. तर दुसरी गोळी मानेमध्ये अडकली. यानंतर सागरला तात्काळ पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात (Apollo Hospital) दाखल करण्यात आले असून, प्लॅस्टिक सर्जरी करुन अडकलेली गोळी काढण्यात आली. तसेच त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गोळीबार केल्यानंतर दोघेही पसार झाले असून, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले. याप्रकरणी योगेश वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....