Saturday, May 2, 2026
Homeक्राईमNashik Crime : घर खरेदीच्या व्यवहारात ४८ लाख रुपयांची फसवणूक

Nashik Crime : घर खरेदीच्या व्यवहारात ४८ लाख रुपयांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घर खरेदीच्या व्यवहारात तब्बल ४८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधिताने रोख व आरटीजीएसद्वारे रक्कम स्वीकारूनही घराची खरेदी पूर्ण न केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रघमनाथ महाजन (४६, रा. गोल्डन पॅलेस, राजीवनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. दत्ताराम संपतराव राज मोळे (रा. कोमल रो बंगल ोज, वृंदावननगर, कामटवाडे, नाशिक) यांच्याशी सुमारे ५० लाख रुपयांच्या घरखरेदीचा व्यवहार (House Purchase) ठरला होता.

१२ डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंतच्या कालावधीत फिर्यादी यांनी एकूण ४८ लाख ६० हजार रुपये रोख व आरटीजीएसद्वारे आरोपीस दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. १८ डिसेंबर २०२५ रोजी दोघेही त्र्यंबक नाका येथील नोंदणी कार्यालयात गेले. तेथे फिर्यादींकडून खरेदीपत्र साठेखतावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मात्र, खरेदीची प्रत देण्यात आली नाही.

दरम्यान, याबाबत विचारणा केली असता, ७/१२ उताऱ्यावर नाव लागल्यानंतर कागदपत्र देतो, असे संशयिताने सांगितल्याचा आरोप आहे. नंतर ७/१२ उताऱ्यावर नाव लागूनही खरेदीची प्रत न देता टाळाटाळ करण्यात आली आणि अखेरीस घर खरेदी करून न दिल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार फिर्यादीने केली आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी करीत आहेत.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...