Sunday, October 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : 'अग्निवीर' प्रशिक्षणार्थी तरुणाची आत्महत्या

Nashik News : ‘अग्निवीर’ प्रशिक्षणार्थी तरुणाची आत्महत्या

नाशिकरोड | प्रतिनिधी

- Advertisement -

आर्टिलरी सेंटरमध्ये अग्निवीर प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय युवकाने बॅरेकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली. अश्विन एम. असे मृत अग्निवीर प्रशिक्षणार्थीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन हा आर्टिलरी सेंटरच्या आर्मी बॅरेकमध्ये राहत होता. त्याने बॅरेकमधील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी देवळाली कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पंकज कुमार यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हवालदार झाडे तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ताज्या बातम्या

Simhastha Kumbhmela : नाशिकमध्ये दोन विश्वविक्रमांचे नियोजन – कुंभमेळा प्राधिकरण...

0
नाशिक, दि. १८ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह भक्तिभाव, जनजागृती आणि सामाजिक सहभाग वाढविण्यासाठी...