येवला | प्रतिनिधी | Yeola
शहरात दोन दुकाने (Shop) फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी, (दि. ५) मध्यरात्रीच्या सुमारास नागडे बायपास रोडवर नागरे एंटरप्राईजेस हे दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील १६ आटा चक्की आणि ९ वॉटर फिल्टर व पंधराशे रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे सहा लाख रुपयांच्या माल चोरून नेला.
- Advertisement -
तर फत्तेबुरुज नाक्यावरील नाकोड सुपर मार्केट हे दुकान फोडून चोरट्यानी तीन पैठण्या, ६ पैठणी ब्लॉउज, गॅस सिलेंडर, इस्तरी व गल्ल्यातून सात हजाराची रोकड चोरून नेली. नाकोड यांच्या दुकानात यापूर्वी तीन वेळा चोऱ्या (Thief) झाल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसात (City Police) गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.





