नाशिक | प्रतिनिधी | Nashik
प्रवाशाचे सोने चोरणाऱ्या संशयिताला (Suspected) अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाने मखमलाबाद येथे सापळा रचून अटक (Arrested) केली. त्याच्याकडून साडेआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत (Seized) करण्यात आला.
वसंत हरी चौधरी यांनी प्रवासादरम्यान दागिणे चोरी झाल्याची तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर चोरी (Theif) करणारा व्यक्ती हा जगझाप मळारोड, मखमलाबाद रोड, नाशिक याठिकाणी गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता येणार आहे. त्यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना दिली.
यावेळी हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक नितीन फुलपगारे, अंमलदार किरण गायकवाड, सचिन करंजे, अनिल गाढवे, मयूर पवार, तुषार मते, राकेश पाटील, राहुल जगझाप, दीपक निकम, संदीप भुरे, समाधान शिंदे, सागर जाधव, प्रवीण राठोड, दत्ता धिंदळे यांच्या पथकाने जगझाप मळारोड, मखमलाबाद रोड, नाशिक (Nashik) येथे सापळा रचून संशयित सुनील जगन्नाथ कुमावत यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान पोलिसांनी (Police) त्याच्याकडून चोरीस गेलेले ८ लाख रुपये किमतीचे ८.०३ तोळे सोने व १ रिक्षा असा ८ लाख, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल बनतोडे, वाघ करीत आहेत.