Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या घरी जीएसटी विभागाचा छापा; शहरात एकच खळबळ

Nashik Crime : सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या घरी जीएसटी विभागाचा छापा; शहरात एकच खळबळ

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

एका नामांकित सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या (Software Developer) निवासस्थानी व कार्यालयावर जीएसटी विभागाने (GST Department) अचानक छापा (Raid) टाकला आहे. ही कारवाई आज (शनिवारी) सकाळी सुरू झाली असून, उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याचे समजते.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, श्रीकांत प्रसाद परे असे संशयिताचे (Suspected) नाव असून, मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी व बनावट इन्व्हॉइस तयार केल्याच्या संशयावरून ही कारवाई (Action) करण्यात आली आहे.

YouTube video player

सदरची छापेमारी सुरू असताना व पोलिसांच्या (Police) गाड्या बघून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही छापेमारी आर्टिलरीसेंटर रोडवरील कपालेश्वर चौकात असलेल्या इमारतीच्या ठिकाणी सुरू आहे.

दरम्यान संशयिताकडून एक पिस्तूल व सहा राउंड जप्त करण्यात आले असल्याचे समजते. त्याचप्रमाणे बनावट सॉफ्टवेअरद्वारे संबंधित व्यक्ती फसवणूक (Fraud) करत होता असेही बोलले जाते.

काय आहे प्रकरण?

संबंधित सॉफ्टवेअर कंपनीने विविध आयटी सेवा पुरवठा केल्याचा दाखला देऊन बनावट इन्व्हॉइस तयार केल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून कोट्यवधींच्या जीएसटीची चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची व कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.

संगणक व डिजिटल डेटा जप्त

छाप्याच्या दरम्यान अधिकार्‍यांनी कंपनीचे संगणक, सर्व्हर, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आणि विविध आर्थिक कागदपत्रे जप्त केली आहेत. तर संबंधित सॉफ्टवेअर डेव्हलपरची चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...