Saturday, October 5, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'छोटी भाभी' एमडी प्रकरण; बेकायदेशीर वसुली उजेडात

Nashik Crime News : ‘छोटी भाभी’ एमडी प्रकरण; बेकायदेशीर वसुली उजेडात

नाशिक | Nashik

एमडी ड्रग्ज (MD Drugs) तस्करीत वर्षभरानंतर अटक (Arrested) केलेल्या इरफान ऊर्फ चिपड्या याने एका राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्याच्या वरदहस्तामुळे शहरात (City) बेकायदेशीर आर्थिक वसुली केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पदाधिकाऱ्यासह चिपड्याचे मोबाईलवरील संवाद एनडीपीएस पथकाच्या हाती आले असून त्यातून भविष्यात पदाधिकाऱ्याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे संकेत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

नाशिकच्या वडाळ्यातून (Wadala) मॅफेड्रॉन (एमडी) तस्करी करणाऱ्या ‘छोटी भाभी’ला सहाय्य करणारा इरफान ऊर्फ चिपड्या शेख व करण सोनटक्के यांना सोमवार (दि.७) पर्यंत नाशिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. इरफान हा आर्थिक कलेक्टरच्या भूमिकेत वावरून वडाळ्यासह शहरातील काही भागातून खासगी व सरकारी ठिकाणांहून थेट ‘पैशांचे कलेक्शन’ करायचा, अशी गंभीर बाब उघड होत आहे. दरम्यान, निर्धोकपणे त्याने ही वसुली कोणासाठी केली व त्यातून काही हिस्सा तो कुणाला देत होता, या गोष्टींचा तपास सुरू झाला आहे. तर दुसरीकडे ‘छोटी भाभी’ ला त्याचे पाठबळ आर्थिक होते की राजकीय यासंदर्भातही पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.

हे देखील वाचा : Crime News : मुंबईत अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची धारदार शस्राने वार करत निर्घूण हत्या; राजकीय वर्तुळात खळबळ

सोबतच याआधी ड्रग्ज तस्कर छोटी भाभीनंतर खा. संजय राऊत (Sanjay Raut) आणि सुषमा अंधारे यांनी केलेल्या ‘बडी भाभी’ संदर्भातील आरोप-प्रत्यारोपांचा तपास केला जाणार आहे. वडाळागाव एमडी प्रकरणाचा तब्बल एक वर्षान पुन्हा तपास सुरू झाल्यावर शहरातील एका पदाधिकाऱ्याशी विशेष ‘जवळीक’ असलेल्या इरफानला नाशिक अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनडीपीएस) पुराव्यांनुसार अटक केल्याने खळबळ उडाली आहे. इरफान शेख (रा. सादिकनगर, वडाळा) याचे ‘छोटी भाभी’शी वारंवार मोबाईलद्वारे संपर्क झाल्याचे तपासात समोर आले आहे. तर करण सोनटक्के (रा. नाशिकरोड) याने ‘छोटी भाभी’ला एमडी काही ग्रॅम पुरवले होते.

हे देखील वाचा : Nashik Crime News : देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा सराईत जेरबंद

असे झाले प्रकरण उघड

नाशिक ‘एनडीपीएस’ने ५ ऑक्टोबर २०२३ रोजी वडाळ्यात छापा मारून ‘एमडी’ तस्कर वसीम रफीक शेख (३६) व नसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (३२, रा. सादिकनगर, वडाळागाव) यांना अटक केली. पुढील तपासात छोटी भाभीचा पती इम्तियाज शेखला जिल्ह्याबाहेरून, भिवंडीतून सलमान अहमद फलके, ठाणे शहरातून शब्बीर ऊर्फ आयना अब्दुल अजीज मेमन, कसारातून सद्दाम सारंग यांना अटक झाली. यापैकी वसीम, छोटी भाभी व इम्तियाज कारागृहात आहेत.

मोबाईलमुळे सुगावा

‘छोटी भाभी’ व वसीम यांचे आठ मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते. त्याच्या तांत्रिक विश्लेषणानुसार सातत्याने इरफानसोबत संपर्क झाल्याचे समजले. त्यावरून ‘एनडीपीएस’ने पाळत ठेवत इरफानला ताब्यात घेतले. इरफान हा एका राजकीय पदाधिकाऱ्याचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले असून त्याच्या सोशल मीडियावरही त्या पदाधिकाऱ्यासमवेतचे फोटो आहेत. सन २०२३ मध्ये नाशिकमध्ये एमडीचे कारखाने उद्ध्वस्त झाल्यापासून महाविकास आघाडी व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर विधानसभेतही याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या गुन्ह्यातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या (Police) हाती लागल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या