Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik Crime News : देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा सराईत जेरबंद

Nashik Crime News : देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा सराईत जेरबंद

आडगाव गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्टल (Countrymade Pistol) बाळगणाऱ्या सराईतास जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास (Adgaon Crime Investigation Team) यश मिळाले आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस (Police) करीत आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : धनवटे खून प्रकरणात राजकारण?

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी बघता सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन जेरबंद करणे. तसेच शस्त्र बाळगणाऱ्या वर कारवाई करण्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संबधित पोलिस ठाण्यांना आदेशित केले होते. सोमवार (दि.३०) रोजी आडगाव गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार निखिल वाघचौरे यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, आडगाव पोलीस ठाणे रेकॉर्ड वरिल संशयित सुरज कांतीलाल वर्मा हा देशी बनावटीचे कट्टा घेऊन जनार्दन स्वामी मठाचे मागील गेट जवळील वडाचे झाडा खाली असलेल्या मारुती मुर्ती जवळून तपोवन नाशिक येथे येणार असल्याची समजली.

हे देखील वाचा : Nashik News : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

यावेळी सापळा रचून रेकॉर्ड वरिल संशयित नामे सुंरज कांतीलाल वर्मा (वय २४, रा. फ्लॅट. नं ०७, रेणुका रेसिडेन्सी, दत्तात्रयनगर, अमृतधाम नाशिक) यास ताब्यात घेतले. त्यांची अंग झडती घेतली असता तीस हजार रुपये किमतीचे एक लोखंडी धातुचा देशी बनावटीची पिस्टल एक मॅकझीन व त्यात ०१ पिवळया धातुचा जिवंत राऊड जप्त करण्यात आले. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा (Case) दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस हवालदार देवराम सुंरजे करीत आहेत.

हे देखील वाचा : आदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना

यांनी बजाविली कामगिरी

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण , पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त प‌द्मजा बढे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन खैरनार, गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ, देवराम सुरंजे, दादासाहेब वाघ, निलेश काटकर पोलिस अंमलदार दिनेश गुंबाडे, निखिल वाघचौरे, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, महीला पोलिस हवालदार वैशाली बच्छाव, महीला पोलिस अंमलदार वैशाली महाले यांनी बजाविली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या