Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime : चोरट्यांचीही दिवाळी; चेनस्नॅचिंग,चोरी, घरफोड्या उदंड

Nashik Crime : चोरट्यांचीही दिवाळी; चेनस्नॅचिंग,चोरी, घरफोड्या उदंड

आठ लाखांचा मुद्देमाल लंपास

नाशिक | भारत पगारे | Nashik

नाशिककर एकीकडे दिवाळी (Diwali) साजरी करत असतानाच चोरट्यांनी (Thieves) विविध भागांत व उपनगरांत हैदोस मांडला. बाजारपेठ, बस स्थानकांमध्ये असलेल्या गर्दीच्या गैरफायदा घेत महिला प्रवाशांच्या दागिन्यांका डल्ला मारण्यासह चोरट्यांनी पाच दुचाकी लंपास केल्या. यासह सातपूरमध्ये घरफोडी तर इतर ठिकाणी आठ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच लक्ष्मीपूजनाच्या सायंकाळी इंदिरानगरात (Indiranagar) चैनस्नॅचिंग झाली असून दहा गुन्ह्यांमध्ये आठ लाखांचा मुद्देमाल चोरी झाल्याची नोंद झाली आहे. गुन्हे दाखल असून तपास सुरु झाला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : तोतया आयपीएसचे कारनामे उघड; आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी बनला बोगस अधिकारी

शहरात दिवाळीचा उत्साह असतानाच चोरट्यांनी बाजारपेठा, गल्लीबोळांसह बसस्थानकांमध्ये हात मारून दिवाळीचा उत्सव साजरा केला. ८ लाख २२ हजार ४३६ रुपयांचा मुद्देमाल १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी पळवला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवून गुन्हे शोध पथकांना संशयितांच्या मागावर पाचारण करण्यात आले आहे. दम्यान, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास टाकळी रस्त्यावरील भगवती नगरातून ओम धुर्वे या गैरेज कामगाराच्या खोलीत खिडकीतून हात घालून चोरट्याने दहा हजारांचा मोबाइल (Mobile) पळवला. तर पाटीदार भवनजवळील कृष्णा ग्रीस सोसायटीतून पंधरा हजार रुपयांच्या बॅटऱ्या अज्ञातांनी पळवल्या आहेत. तर प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या दोघांना भद्रकाली पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा

दुचाकीची चोरी

पंचवटी भाजी बाजारातून दुपारी बारा ते दोन यावेळेत विकास बारहाते (रा. इंदिरानगर) यांची एमएच १५ एसी ७०५७ क्रमांकाच्या दुचाकीची, सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ओढा येथील हॉटेलसमोरुन सीताराम हिलिंग (रा. निफाड) यांच्या एमएच एफएक्स ७२६६ क्रमांकाच्या दुचाकीची, नाशिक-पुणे रस्त्यावरील दत्त मंदिराजवळून महेश दिलीप प्रधान यांची एमएच १५ एचबी ११६३ क्रमांकाची दुचाकीची, लोहशिंगवे येथून मोहन जुद्रे यांची एमएच १५ डीवाय ०८३३ क्रमांकाच्या दुचाकीची, तर नाशिकरोड बस स्थानकासमोरुन ऋतिक कांबळे यांची एमएच १५ एचपी २४६६ क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली.

हे देखील वाचा : Maharashtra News : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मांची नियुक्ती

लक्ष्मीपूजन-भाऊबीजेला चोरी

२ नोव्हेंबर : दुपारी ३.३० वाजता भद्रकालीतील लिंबा हनुमान मंदिराजवळ रुकसाना पठाण (रा. विल्होळी) यांच्या हातातील कापडी पिवशी हत्याराने फाडून त्यातील ३० हजार ३६६ रुपयांचे दागिने व पैसे चोरले.
रात्री ८.३० वाजता चार्वाक चौक सोनाली बोराडे या सोसायटीजवळ उभ्या असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बह्मण्याने बोराडेच्या गळ्यातील ६५ हजारांचा सोन्याचा लक्ष्मी हार लंपास केला.
३ नोव्हेंबर : सकाळी ९.४५: नवीन मेळा स्थानक: गायत्री पाटील (रा. आडगाव) या नाशिक-धुळे बसमध्ये चढ़त असताना २२ हजार सातशे रुपयांचे दागिने व पैसे लंपास.
दुपारी ३ वाजता : ठक्कर बाजार ते द्वारका विकास पाटील (रा. सिन्नर) यांची पत्नी प्रतिभा यांच्या पर्समधील ५४ हजार सातशे रुपयांचे दागिने व पैशांची चोरी,
दुपारी ४ वाजता नाशिकरोड ते चेहडी शिवशाही बसमधून प्रवास करताना अनिता वराडे (रा. नाशिकरोड) यांच्या बॅगेतील १६ हजार दोनशे रुपयांच्या सोन्याच्या कर्णफुलांसह बाराशे रुपयांची चोरी झाली.
सायंकाळी ६ वाजता द्वारका: बटू गवळी (रा. काठेगल्ली) है मुलीसह सिन्नरच्या बसमध्ये चढ़त असताना साडेसहा हजार रुपये चोरले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित शंकर निवृत्ती उफाडे (२६, रा. देवळाली कॅम्प) याला साथीदारासह अटक केली आहे.

लक्ष्मीपूजनापूर्वी रोकड लंपास

नवश्या गणपती मंदिराजवळील नक्शा इलाईट सोसायटीबाहेर उभ्या असलेल्या एमएच १५ ईपी ४३३३ क्रमांकाच्या कारमधून चोरट्यांनी दोन लाख हजार रुपये लंपास केले. लक्ष्मीपूजनापूर्वी कारच्या डॅशबोर्डवर रक्कम ठेवलेली असताना समोरील कार फोडून अज्ञातांनी ही चोरी केली. याबाबत किरण बडे यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पाडव्याला घरफोडी

२ नोव्हेंबर रोजी सातपूर येथील गुलमोहर कॉलनीतल्या ब्लू हिल अपार्टमेंटमध्ये ज्ञानेवर धामणे यांच्या घरातील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी दागिने व पैसे लंपास केले. २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध सातपूर पोलिसांत घरफोडीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्ह्यातील मुद्देमाल

घरफोडी : २ लाख ७० हजार रुपये
वाहन चोरी :१ लाख २२ हजार
काच फोडून चोरी: २ लाख १० हजार
प्रवाशांची चोरी: १ लाख १००
इतर चोरी: ५५ हजार ३३६
चेन स्नॅचिंग: ६५ हजार
एकूण ८ लाख २२ हजार

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या