Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमNashik Crime : आंतरराज्यीय तमीळ टोळी ताब्यात

Nashik Crime : आंतरराज्यीय तमीळ टोळी ताब्यात

नाशिक | Nashik

चोरी (Thieves) करण्यासाठी ‘स्पेशल टेक्निक’ वापरुन नाशिकसह (Nashik) राज्यातील विविध कारच्या काचा फोडून त्यांच्या सीटावरील लॅपटॉप व इतर महागडा मुद्देमाल लांबविणाऱ्या आंतरराज्यीय तमिळ टोळीचा गुजरातमधील वडोदरा पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. जानेवारी महिन्यात सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या अशाच स्वरुपाच्या एका गुन्ह्याची उकल या टोळीकडून झाली असून सरकारवाडा पोलिसांचे एक पथक संशयितासह मुद्देमालाचा ताबा घेण्यासाठी लवकरच वडोदरा येथे रवाना होणार आहेत.

- Advertisement -

वडोदरा पोलिसांनी (Vadodara Police) चतुर्भूज केलेली ही टोळी तामीळनाडू राज्यातील असून संशयितांवर (Suspected) महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यात गंभीर गुन्हे नोंद आहेत. सरकारवाडा पोलिसांच्या (Sarkarwada Police) हद्दीतील कॅनडा कॉर्नर येथील बीएसएनएल ऑफिसजवळील चैतन्य हॉस्पिटलजवळ २ जानेवारी रोजी दुपारी मोहन निवृत्ती पिंगळे (रा. डिके नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांनी कार पार्किंग केली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी काहीतरी नवी पद्धत वापरुन कारच्या दरवाज्याची एक काच फोडून सीटावरील अँपल मॅकबूक, मोबाईल, चार्जर व बॅग असा ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता.

काहीवेळाने ही घटना लक्षात येताच पिंगळे यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. सरकारवाडा पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरु असताना, १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान, गुजरात येथील वडोदरा शहर पोलिसांच्या डीसीबी पोलीस ठाण्याने अशाच स्वरुपाच्या एका गुन्ह्यात तामिळनाडू राज्यातील (Tamil Nadu State) काही संशयित चोरट्यांना अटक केली. या टोळीकडे केलेल्या सखोल तपासात चोरीचे मोबाईल व इतर मुद्देमाल आढळून आला. त्यासोबतच चोरट्यांनी कॅनडा कॉर्नर येथील पिंगळे यांच्या गाडीची काच फोडून मॅकबूकची चोरी केल्याची कबुली दिली.

त्यानुसार या गुन्ह्यातील मुद्देमालही हस्तगत केला आहे. त्यानुसार, डीसीबी पोलीस ठाण्याने (DCB Police Station) नाशिक शहर पोलीस आयुक्तालयास सरकारवाडा हद्दीतील एका गुन्ह्याची उकल झाल्याचे कळविले असून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी कळविले आहे. त्यानुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या सूचनेने उपनिरीक्षक संजोग टिपरे व अंमलदारांचे पथक डीसीबी पोलीस ठाण्यात जाणार आहेत. तेथून या गुन्ह्यातील मुद्देमाल व संशयितांचा ताबा सरकारवाडा पोलीसांकडे सोपविणार आहेत.

नाशकातील गुन्हे उघड होणार?

शहरात यापूर्वी कारच्या काचा फोडून कारच्या सीटावरील पैसे, दागिने, बॅग व लॅपटॉप आणि मोबाईल लांबविल्याचे अर्धा डझनहून अधिक गुन्हे नोंद आहेत. हे गुन्हे तमिळ चोरट्यांनी केले आहेत की अन्य दुसरी टोळी कार्यरत आहे, याचा तपास नाशिक पोलीस करणार आहेत. लवकरच संशयितांना अटक करुन नाशिकमध्ये आणले जाणार आहेत.

मुद्दे

कारच्या काचा फोडण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब
संशयितांवर अनेक राज्यात चोरीचे गुन्हे
मुद्देमाल चोरी केल्यानंतर मुद्देमालाची विल्हेवाट आणि विक्री

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...