नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहरात (Nashik City) भाजीपाला खरेदीसह मॉर्निंग वॉक आणि शतपावली करणे वयोवृद्धांसह महिलांना नकोसे झाले आहे. कारण, शहरात भर सकाळी जागोजागी तोतया पोलिसांनी (Police) मनमानी पद्धतीने नाकाबंदी करुन वयोवृद्धांना पुढे जाण्यास मज्जाव करुन त्यांचे दागदागिने पळविल्याचा सीलसीला कायम ठेवला आहे. इंदिरानगर भागातील आदित्य हॉलजवळ शुक्रवारी (दि.९) सकाळी एका वयोवृद्धास तोतया पोलिसांनी (Fake Police) लक्ष करुन पंचावन्न हजारांचे दागिने हातोहात लांबविले आहेत. त्यानुसार, इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून तपास सुरु आहे.
इंदिरानगर (Indiranagar) हद्दीतील राजीवनगर परिसरातील कानिफनाथनगर येथे ५४ वर्षीय चंद्रकांत बाळकृष्ण धोंगडे हे वास्तव्यास आहे. ते नेहमीप्रमाणे सकाळी साडेसहा ते सात वाजता दररोज मॉर्निंग वॉकसाठी जातात. गुरुवारी सकाळी सात वाजता परिसरातील आदित्य हॉलजवळून वॉक करत होते. तेव्हा दोन संशयित त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही पोलीस आहोत, पुढे जाऊ नका काही वेळापूर्वी येथे गंभीर घटना घडली आहे’, असे सांगितले. त्यामुळे धोंगडे भांबावून गेले. समोर पोलीस व मागे गंभीर घटना या चक्रात अडकून ते विचार करत असताना संशयित तोतया पोलिसांनी त्यांच्याशी बोलणे सुरु करुन ‘दागिने घालून फिरत जाऊ नका, धोका आहे’, असे सांगून ते काढून ठेवण्यास सांगितले.
दरम्यान, धोंगडे हे घाईगडबडीत दागिने (Jewelry) खिश्यात ठेवत असताना तोतया पोलिसांनी त्यांना मदतीचा बहाणा करुन त्यांच्या गळ्यातील चेन व बोटातील अंगठी असा ५५ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यानंतर तोतया पोलीस पाथर्डी फाटामार्गे मार्गस्थ झाले असता धोंगडे यांना काही वेळाने दागिने नसल्याची जाणीव झाली. त्यांनी कुटुंबासह पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे तोतया पोलिसांनी फसवणूक (Farud) केल्याचे उघड झाले. तपास हवालदार शेख करत आहेत.
घटनांचा तपास रखडला की, दुर्लक्ष
तोतया पोलिसांनी महिलांसह ज्येष्ठांना लक्ष केले आहे. त्यातच सोनसाखळी चोरही कार्यरत आहेत. दररोज जबरी चोरी व तोतयेगिरीच्या दोन घटना शहरात घडत आहेत. त्यातच मागील दोन महिन्यांत झालेल्या तोतया पोलिसांनी घडविलेल्या पाच ते सहा घटनांचा कोणत्याही पोलीस ठाणे अथवा गुन्हेशाखा युनिटने सोक्षमोक्ष अर्थात छडा लावलेला नाही. त्यामुळे केवळ कागदोपत्री गुन्हे नोंद असून त्यांचा तपास थंडावला आहे. वास्तविक तपास सुरु आहे की नाही, असा आक्षेप मागील घटनांतील काही तक्रारदार नोंदवित आहे. अशा गंभीर गुन्ह्यांतील तोतया पोलीस पसारच असून त्यांची टोळी हेरण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.
तपास सुरु आहे!
* मागील घटनांतील तोतयांचा ठावठिकाणा लागेना.
* या स्वरुपाची गुन्हे उकल क्वचितच.
* गस्ती पथके, बीटमार्शल्स फिल्डवर नसल्याचा नागरिकांचा दावा.
* विविध हद्दीत चेनस्नॅचिंग, जबरी चोरी वाढल्या.
* ब्रेडबटर आणायला जाणे मुश्कील.
* तपासाधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात वेळकाढूपणा