Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण; मंत्री भुजबळांकडून दखल, कठोर कारवाईच्या पोलिसांना...

Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण; मंत्री भुजबळांकडून दखल, कठोर कारवाईच्या पोलिसांना सूचना

नाशिक | Nashik

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) साधू-महंतांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना (Journalists) त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ कमानीजवळ प्रवाशी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केली आहे. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

- Advertisement -

या मारहाणीत पत्रकार किरण ताजणे (Kiran Tajne) गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अपोलो रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दोघे जण जखमी असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

YouTube video player

त्र्यंबकमध्ये प्रवेश येथील स्वामी समर्थ कमानीजवळ फी वसुलीसाठी काही मुले ठेवण्यात आली आहेत. आज त्र्यंबकमध्ये होणाऱ्या साधू-महंत यांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी हे पत्रकार गेले असता त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या. यावेळी पत्रकारांनी आम्ही बैठकीच्या (Meeting) वार्तांकनासाठी चाललो आहोत, असे सांगितले. त्यावेळी पावती फाडणाऱ्यांकडून गाड्या बाजूला घेण्यास सांगत तुम्ही पत्रकार किंवा कोणीही असला तरी आम्ही तुमच्या गाड्या सोडणार नाही, असे फर्मान सोडले.

दरम्यान प्रचंड गोंधळ झाल्यानंतर या वसुलीधारकांनी आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. यावेळी जमा झालेल्या टोळक्याने पत्रकार किरण ताजणे यांना लाथाबुक्क्या, छत्री आणि दगडांनी मारहाण केली. यात ताजणे गंभीर जखमी झाल्याने त्यांना इतर पत्रकारांनी तात्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल केले.

दरम्यान, या मारहाण प्रकरणी त्र्यंबक पोलीस ठाण्यात (Trimbak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एकावर ३०७ चा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. सध्या ताजणे यांच्यावर नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची मंत्री गिरीश महाजन सायंकाळी भेट घेणार आहेत.

भुजबळ यांनी घेतली ताजणे यांची भेट

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार किरण ताजणे यांची अपोलो रुग्णालयात जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, ही घटना अतिशय निंदनीय असून, त्याचा मी निषेध करतो. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना फोन करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आपण केल्या आहेत.

मंत्री विखेंकडूनही घटनेचा निषेध

या घटनेबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत म्हटले की, माध्यम प्रतिनिधींवर स्थानिक तरुणाकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. प्रसारमाध्यमे लोकांच्या समस्या, वास्तव आणि सत्य समाजासमोर मांडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांवर हल्ला करणे, हे अत्यंत निंदनीय असून कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्या आरोपींवर तातडीने आणि कडक कारवाई करावी.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...