देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp
चार दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे सुरक्षारक्षक विजय गायकवाड हे ड्युटी बजावत असताना चौघा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता, ही घटना ताजी असताना तोच पुन्हा कोयता गँगने एकावर जीवघेणा हल्ला केला. जखमींना उपचारासाठी कॅन्टोन्मेन्ट बोर्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये (Deolali Police Station) तिघां हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस मिळालेल्या सूत्रांकडून माहितीनुसार, फिर्यादी संतोष राजेंद्र जाधव (३९) हा परिवारासह राहात असून मंगळवारी रात्री एकच्या सुमारास घरी जात असताना सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोर (Shop) पाठीमागून ओळखीचे असलेले योगेश सुनील जाधव, ऋषीकेश दिनेश लोखंडे, यश विकास मोरे हे तिघेजण अॅक्टिव्हावर हातात कोयते घेऊन आले.
रस्त्यात मला थांबवत माझ्याकडे पैशांची मागणी केली. मी पैसे देण्यास नकार देताच जीव ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर कोयता (Koyta Gang) मारला तर यश मोरे याने लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करत खिशातील तीन हजार रुपये काढून घेत रस्त्यावर नाचून, जाणाऱ्या व येणाऱ्या लोकांवर कोयता दाखवत दहशत निर्माण केली होती तर संतोष जाधव यांना तत्काळ उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर यादिवशी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने हाडोळा परिसरात चार रिक्षांची तोडफोड (Sabotage) केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस शोध घेत आहेत




