Monday, February 16, 2026
Homeक्राईमNashik Crime : बनावट खात्यातून लाखोंचा अपहार; जाब विचारताच कंपनी मालकास अकाऊंटंटची...

Nashik Crime : बनावट खात्यातून लाखोंचा अपहार; जाब विचारताच कंपनी मालकास अकाऊंटंटची धमकी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विश्वासू ठिकाणच्या पदावर कार्यरत अकाऊंटंटनेच कंपनीच्या नावाने डुप्लिकेटफ बँक खाते (Fake Account) उघडून तब्बल २३ लाख ३४ हजार ५०५ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबड औद्योगिक वसाहतीत उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मालकाने जाब विचारताच संशयिताने पैसे विसरून जा, नाहीतर तुमचे नाव घेऊन आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

- Advertisement -

दीपक मधुकर पगार (४०, रा. आनंद अपार्टमेंट, अंबडगाव) असे संशयिताचे नाव असून अंबड पोलिसात (Ambad Police) फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी जयेश गोविंद महाले (३९, रा. अश्विननगर, सिडको) अंबड द्योगिक वसाहतीत जयेश एंटरप्राईजेसफ ही कंपनी आहे. कंपनीचे वेंडरकडून देण्यात आलेले अधिकृत खाते बँक ऑफ बडोदा येथे असताना, संशयिताने कंपनीच्या नावाने पवननगर येथील अभ्युदय को-ऑप बँक मध्ये स्वतंत्र खाते उघडल्याचे समोर आले.

YouTube video player

फेब्रुवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कंपनीच्या एका वेंडरकडून देण्यात आलेला २३ लाख ३४ हजार रुपयांचा धनादेश या नव्या खात्यावर जमा करून तो वटविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. नियमित आर्थिक पडताळणीदरम्यान तफावत लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. मालकाने विचारणा करताच संशयिताने उडवाउडवीची उत्तरे देत धमकीचा मार्ग अवलंबला. विश्वासघात, बनावट खाते उघडणे आणि रकमेचा अपहार या गंभीर बाबींमुळे औद्योगिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंबड पोलिस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात गुप्तहेरांची एन्ट्री?

0
मुंबई । Mumbai राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या...