Sunday, January 25, 2026
Homeक्राईमNashik Crime : तिल्लोळी परिसरात ५० किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची...

Nashik Crime : तिल्लोळी परिसरात ५० किलो गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील तिल्लोळी शिवारात (Tilloli Area) अवैधरित्या गांजाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा (Raid) टाकून ५० किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशीत केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या पथकाने दिंडोरी पोलीस ठाणे (Dindori Police Station) हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ गांजाची विक्री करणारे आरोपीवर छापा टाकून कारवाई केली आहे.

YouTube video player

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळीपाडा (पो. कोचरगाव) परिसरात एक संशयित आरोपी हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम चंदर नामदेव भरसट रा. मु. तिल्लोळी, पो. कोचरगाव यास ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून १०,२,६०० रुपये व ५० किलो १३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

सदर संशयित आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मानवी मनावर विपरीत परिणाम करणारा गांजा नावाचा अंमली पदार्थ कब्जात बाळगुन विक्री करतांना मिळून आला. याप्रकरणी त्याच्याविरूध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर संशयित आरोपी हा अंमली पदार्थ गांजाची साठवणुक करून विकी करत असल्याचे उघडकीस आलेले असून, हा गांजा कोठून आणला आणि कोणास विक्री करणार होता, याबाबत पोलीस पथक तपास करीत आहे.

दरम्यान, ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार विनोद टिळे, संदिप नागपुरे, आबा पिसाळ, माधव साळी, श्रीकांत गारूंगे, इम्रान पटेल, रविंद्र गवळी, मपोहवा ललिता शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे.

ताज्या बातम्या

Padma Awards 2026 List : केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील...

0
मुंबई | Mumbai केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यात महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश आहे. यामध्ये लोकनाट्य जपण्यात दिलेल्या योगदानाबद्दल कलाकार रघुवीर...