पेठ | प्रतिनिधी | Peth
पेठ शहरातील (Peth City) अत्यंत वर्दळीचे चौकात रस्त्यालगत उभारलेल्या पत्र्याचे शेडमध्ये कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या मटका, जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या भरारी पक्षकाने गुप्त माहितीचे आधारे टाकलेल्या धाडीत (Raid) ३७ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २९३९० रुपयांची रोख रक्कम व दोन लाख छत्तीस हजार रुपये किमतीचे २८ मोबाइल ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र मगर, पोलिस हवालदार किरण बैरागी, महिला पोलिस हवालदार योगीता काकड, कैलास मानकर यांच्या पथकाने माहितीदारांकडून मिळालेल्या गुप्त माहितीचे आधारे बलसाड रोडवरील हॉटेल अंबिका समोरील पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकली. अत्यंत मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार आदी जोमात सुरु होता. पोलीसांची चाहुल लागताच पळापळ सुरू झाली. कुमक कमी असुनही त्यातील ३७ व्यक्तींना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडील एकुण रोख रक्कम २९३९० तर २८ मोबाइल एकुण २३६००० असे एकुण २,६७३९० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकारास जरब बसण्यासाठी कपील कोतवाल, सुरज कामडी, गिरीधर बोके, बाळा मोंढे, प्रदीपकुमार रायबहादूर, संतोष गुंबाडे, विशाल जाधव, देवराम जाधव सर्व राहणार पिंपळाची आळी पेठ, नितीन मोढे (खोकरतळे), आनंदा भोये (बिजूरपाडा), सोपान धुळे (रानविहीर), शिवनाथ धुळे (रानविहीर), ललीत पवार (उंबरपाडा), भास्कर अत्रे (सोनगाव राहुरी), मनोहर आवारी (अंध्रटे), बळीराम धुळे ( रानविहीर), रघूनाथ गारे (मांडणपाडा), हरीदास भुसारे (रानविहीर), देविदास गावीत (अंधुटे), मोहन गारे (मांडणपाडा), मधूकर डंबाळे (रानविहीर), निवृत्ती प्रधान (वांगणी), पप्पू गारे (मांडणपाडा), गोविंद जाधव (वांगणी), विष्णू प्रधान (तोंडवळ), सुनिल हिरकुडे (वांगणी), यशवंत प्रधान (वांगणी), तुकाराम मोंढे (खोकरतळे), दिपक जाधव (भरुणा), जनार्दन लोखंडे (कुंभाळे), मनोहर पवार (खोकरतळे), गंगाराम दळवी (अंधुटे), सोमनाथ जाधव (वांगणी), परशराम जाधव (भरूणापाडा), संजय गांगोडे (भरूणा), किरण हिरकु ड (वांगणी) यांच्यावर बीएनएस ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावणयात आल्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार किरण बैरागी यांच्या फिर्यादीवरून अंमलदार गायकवाड तपास करीत आहे.




