नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर येथील आयटीआय सिग्नलवरील हॉटेल ऑरा बार गोळीबार प्रकरणी (Firing Case) पोलीस कोठडीत (Police Custody) असलेल्या आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) याच्या अनधिकृत घराची पोलिसांनी झाडाझडती केली. त्यानंतर आज बुधवारी (दि. १५) महापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविण्यात आला.
लोंढे याच्या आयटीआय पुलालगत (ITI Bridge) असलेल्या अनधिकृत बंगल्यावर महापालिकेतर्फे नोटीस चिटकवून पाच दिवसांत अतिक्रमण काढण्याचा अल्टिमेटम संपत असल्याने महापालिकेतर्फे सदरहू अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. सदरहू अतिक्रमण प्रकरणी लोंढे याच्यावर गुन्हा दाखल करून अतिक्रमण काढण्यासाठी येणारा सर्व खर्च लोंढेकडून वसूल करण्यात येणार आहे.
होर्डिंगच्या माध्यमातून लाखोंची कमाई
लोंढे याने उभारलेल्या इमारतीत भुयार सापडले होते. तर इमारतीच्या करती होर्डिंगसाठी लोखंडाचा मोठा सांगाडा उभारण्यात आला होता. या माध्यमातून होर्डिंग लावून परिसरात दहशत माजवण्याचा प्रकार देखील होत होता. याशिवाय याठिकणाहून लोंढे याला लाखो रुपयांचा आर्थिक फायदा होत होता.




