नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस) डॉ. चारुदत्त शिंदे ( Dr. Charudatta Shinde ) यांची सार्वजनिक आरोग्य विभागाने सोमवारी (दि. १९) उचलबांगडी केली. शिंदे यांच्याविरोधातील तक्रारींची शहानिशा करण्यासाठी गठीत समितीने तथ्थ्य केलेल्या चौकशीनुसार दाखल तक्रारींत आढळल्याने शिंदे यांची उचलबांगडी करण्यात येऊन पदस्थापना पालघर जिल्ह्यातील (Palghar District) वानगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ‘वैद्यकीय अधीक्षक’ या रिक्तपदी केली आहे. आता शिंदे यांचा तात्पुरता कार्यभार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आरोग्य प्रशासनाने सोमवारी (दि.१९) रात्री उशिरा हे आदेश काढले. दरम्यान, या बदलीविरोधात (Transferred) मंगळवारी (दि. २०) सकाळी जिल्हा रुग्णालयातील विविध संघटनांनी द्वारसभा घेऊन बदली रद्द करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे बदलीच्या आदेशात नमूद बाबींनुसार, डॉ. शिंदे यांच्याविरोधात आरोग्य संचालकांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने समिती गठीत होती.
हे देखील वाचा : Political News : सर्वोच्च न्यायालयात आज ३० जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी; काय निर्णय होणार?
समितीच्या अहवालानुसार तक्रारीत तथ्य आढळून आल्याने डॉ. शिंदे यांची बदली करण्यात आली. डॉ. चारुदत्त शिंदे यांनी पाठपुरावा केल्याने करोनातील (Corona) साहित्य खरेदीतील अपहारासंबंधी गेल्यावर्षी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार, मागील आठवड्यात याच गुन्ह्यात तत्कालिन प्रशासकीय अधिकारी संशयित डॉ. निखिल सैंदाणे याला अटक करण्यात आली. या गुन्ह्यात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सांचाही समावेश आहे. घोटाळा उघडकीस आणल्याने डॉ. शिंदे आरोग्य विभागासह राज्यात चर्चेत होते.
सतरा दिवस पडताळणी
३१ ऑक्टोबर २२०५ रोजी शासन पत्रान्वये शिंदे यांच्याविरोधातील तक्रारींची पडताळणी करण्यासाठी समिती गठीत झाली होती. या समितीने १७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्रान्वये अहवाल सादर केला. त्यात प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने, डॉ. शिंदे यांना पदावरून इतरत्र बदली करणे क्रमप्राप्त आहे, असे म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : BMC Election : उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेत किशोरी पेडणेकरांवर सोपवली मोठी जबाबदारी; ‘या’ पदावर केली नियुक्ती





