Saturday, May 9, 2026
Homeक्राईमNashik Crime : घातक मांजाची विक्री सुरूच; १०१ गट्टूंसह तरुण अटकेत

Nashik Crime : घातक मांजाची विक्री सुरूच; १०१ गट्टूंसह तरुण अटकेत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पतंग उडवण्यासाठी राज्यात वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजाचा (Nylon Manja) वापर व विक्रीवर बंदी असतानाही नाशिक शहरात त्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. भारतनगर परिसरात शहर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कारवाई (Action) करत घातक मांजाचे तब्बल १०१ गडू जप्त केले असून, २२ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. या कारवाईमुळे नायलॉन मांजाविरोधातील पोलिसांची धडक मोहीम अधिक तीव्र स्वरुपात विस्तारत असल्याचे दिसते.

- Advertisement -

फारुक जाफर मुलाणी (२२, रा. मुलतानपुरा, जुने नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbai Naka Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण व गुलाब सोनार यांना भारतनगर झोपडपट्टी परिसरात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे युनिट दोनचे प्रभारी व सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.

पथकातील उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी व प्रवीण वानखेडे यांनी भारतनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सापळा रचत प्लास्टिकच्या गोणीतून नायलॉन मांजा वाहून नेणाऱ्या संशयितास ताब्यात घेतले. तपासादर म्यान त्याच्याकडून केटीसी कंपनीचे विविध रंगांचे १०१ गड्डू जप्त केले. जप्त मांजाची अंदाजे किंमत १ लाख १ हजार रुपये इतकी आहे. तपासासाठी संशयित फारुकला मुंबईनाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यामुळे धोकेदायक

नायलॉन मांजा हा अत्यंत धारदार व जीवघेणा असल्याने दुचाकीस्वार, पादचारी, पक्षी तसेच लहान मुलांसाठी गंभीर धोका निर्माण करणारा आहे. महाराष्ट्र शासनाने नायलॉन मांजाच्या विक्री, साठवणूक व वापरावर कडक बंदी घातली आहे. तरीही काही विक्रेते नियमांना हरताळ फासत गुप्तपणे नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

गेल्या १५ दिवसांतील मांजा कारवाई

एकूण कारवाया : ८
अटक केलेले संशयित : ११
जप्त नायलॉन मांजा : ३५० हून अधिक गट्टू
जप्त मालाची अंदाजे किंमत : ४.५ ते ५ लाख रुपये
कारवाईची ठिकाणे : जुने नाशिक, पंचवटी, सातपूर, इंदिरानगर, मुंबई नाका

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...