Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNashik Crime : वाशीतून नाशिकला ड्रग्ज पुरवठा; 'एमडी' चे नवे डिलर, पेडलर...

Nashik Crime : वाशीतून नाशिकला ड्रग्ज पुरवठा; ‘एमडी’ चे नवे डिलर, पेडलर एनडीपीएसच्या जाळ्यात

पावणेदोन लाखांचा मेफेड्रोन जप्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात काही रिक्षाचालकांकडून एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन) विक्री सुरु असल्याचे उघड असताना, मुंबईतून (Mumbai) स्वस्तात एमडी ड्रग्ज (MD Drugs) खरेदी करून ते नाशिकमध्ये (Nashik) विकणाऱ्या नव्या ड्रग्ज डीलर व पेडलर्सला अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहर पोलिसांच्या (City Police) अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी (दि. १६) नाशिकरोडच्या फर्नांडिसवाडीतील मराठा निवासात धाड टाकून ड्रग्ज डिलर संशयित विजय सुखदेव सोनवणे (वय ३९) याला अटक केली आहे. तपासात सोनवणे याने संशयित मित्र व ड्रग्ज पेडलर रोहित नेहे व कैफ पठाण यांना अनुक्रमे वीस ग्रॅम एमडी विक्रीसाठी दिल्याचे तपासात समोर आले आहे. कारवाईत पावणे दोन लाखांचे ३४ ग्रॅम मेफेड्रोन हस्तगत करण्यात आले आहेत.

YouTube video player

केंद्र व राज्य शासनाने (Government) सर्वत्र अंमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले आहे. त्यानुसार, कारवाया सुरु असून शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी एनडीपीएस अर्थात शहर पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकास गांजा, चरस, अफिम, एमडीची विक्री व तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.

त्यानुसार, पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे व पथक संशयितांचा (Suspected) शोध घेत असताना त्यांना फर्नांडीसवाडीत विजय सोनवणे याच्याकडे ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्याच्या घरी धाड टाकून तपासणी केली. तेव्हा एक लाख ७० हजार रुपयांचे ड्रग्ज आढळून आले. त्याच्याकडे विचारणा करता त्याने हे ड्रग्ज मुंबईतील वाशी भागात राहणाऱ्या स्टीफनभाई या संशयिताकडून आणल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, प्रकरणात सोनवणेसह नेहे व पठाणला न्यायालयाने उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) दाखल एनडीपीएसच्या (NDPS) गुन्ह्यात शुक्रवारपर्यंत (दि. २२) पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. स्टीफनचा शोध सुरु झाला आहे.

तिघेही मित्रच

संशयित नेहे हा विहितगावात राहणारा असून पठाण हा सिन्नरफाटा भागातील रहिवासी आहे. सोनवणे आणि ते एकमेकांचे मित्र असून सोनवणे याने काही दिवसांपूर्वीच दोघांना अनुक्रमे वीस ग्रॅम एमडी विक्रीसाठी दिले होते. ग्राहक जितकी मागणी करेल, त्यानुसार ते पुरवठा करत होते. विशेष म्हणजे दोन ते साडेतीन हजार रुपये प्रति ग्रॅमने हा अवैध व्यवसाय सुरु होता, असे तपासात समोर येते आहे. नेहे हा सराईत गुन्हेगार आहे.

नाशिकमध्ये एमडीची क्रेझ

शहरात एमडी ड्रग्जविरोधात एनडीपीएस व स्थानिक पोलिसांनी चालू वर्षात चौदा कारवाया करुन ३५ संशयितांवर कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिकला बसत चाललेला एमडीचा फास घट्ट होतो आहे. कारवाया होऊनही विविध ठिकाणी एमडीचे डिलर, पेडलर व ग्राहक एकमेकांशी संधान साधून आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...