नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील अंमली पदार्थविरोधी पथकाने (MD) ड्रग्ज विक्रीविरोधात कारवाई करत ४० हजारांचे एमडी व अन्य सामग्री असा १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इंदिरानगर परिसरातील (Indiranagar Area) राणेनगरात सापळा रचून संशयितांना (Suspected) पकडण्यात आले. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात वाढत्या ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.




