Thursday, September 19, 2024
HomeनाशिकNashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस 

Nashik Crime News : सोनसाखळी चोरांकडून १४ गुन्हे उघडकीस 

इंदिरानगर व अंबड पोलिसांची कामगिरी 

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

- Advertisement -

इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) अटक केलेल्या संशयितांकडून अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ ठिकाणी सोनसाखळी (Gold Chain) केल्याचे उघड झाले असून तीन संशयितांसह विधिसंघर्षित बालकांकडून तब्बल १७ लाख ५८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सोने खरेदी करणाऱ्या सोनारावरही गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याचे उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली. 

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकोलीकर ,अंमलदार सागर कोळी व जयलाल राठोड यांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले होते. त्यानंतर  इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित (Suspected) परवेज जावेद मणियार व विधी संघर्ष बालकाकडून तपास करत ७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये ८१ ग्राम २९० मिलिग्रॅम सोने व एक पल्सर मोटरसायकल असा ६ लाख ९८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला व संशयितांनी गुन्हा करताना वापरलेला कोयता हस्तगत केला.

यातील विधी संघर्षित बालकाला अंबड पोलिसांनी ताब्यात  घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या साथीदार मनोज संजय ओतारी, अक्षय सुनील बोरकर व दोन विधी संघर्षित (सर्व रा. शिवाजीनगर, सातपूर ) यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली देत गुन्ह्यातील  १४ तोळे ३ मिलीग्राम वजनाचे सोने व गुन्ह्यात  वापरलेली एक मोटरसायकल असा १० लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दोन्ही गुन्हे मिळून एकूण परिमंडळ २ क्षेत्रातील १४ गुन्हे उघडकीस आले व त्यात १७ लाख ५८ हजार ५२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  

दरम्यान, सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील  पवार, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक अंकोलीकर, सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळ, उपनिरीक्षक भूषण सोनार, उपनिरीक्षक जनकसिंग गुनावत, अंमलदार सागर परदेशी , मुशरीफ शेख, योगेश जाधव ,सौरभ माळी ,प्रकाश नागरे ,शामल जोशी ,सचिन करंजे ,अनिल गाढवे, मते संदीप भुरे ,राकेश राऊत,मयूर पवार आदींच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या