Tuesday, April 28, 2026
Homeक्राईमNashik Crime News : बनावटगिरीचा बंगळुरू प्लॅन; उद्योजकाच्या सह्यांची छेडछाड, २० लाखांचा...

Nashik Crime News : बनावटगिरीचा बंगळुरू प्लॅन; उद्योजकाच्या सह्यांची छेडछाड, २० लाखांचा दणका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमधील एका नामांकित उद्योजकाला चक्क बंगळुरू न्यायालयाचे (Bangalore Court) समन्स धाडून २० लाख रुपयांच्या वसुलीचा बनावट दावा दाखल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पिनॅकल इंडस्ट्रीजचे संचालक अमोल रंगनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) संशयित सुधीर आचार्य आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक व दस्तऐवज बनावटीकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

फिर्यादी अमोल जाधव यांना २३ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू न्यायालयाकडून एक समन्स प्राप्त झाले होते. ज्या व्यक्तीला कधी पाहिले नाही किंवा ज्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही, अशा सुधीर आचार्य नावाच्या व्यक्तीने जाधव यांच्याविरोधात मनी सूट दाखल (Case) केला होता व त्यात १८ फेब्रुवारी २०२६ रोजी बंगळुरू न्यायालयात हजर राहण्याचे आदेश होते. या धक्कादायक प्रकारामुळे जाधव यांना धक्का बसला. दरम्यान, यानंतर जाधव यांनी प्रत्यक्ष बंगळुरू गाठून कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा संशयितांनी कट रचल्याचे समोर आले.

१५ एप्रिल २०२४ रोजी जाधवांनी सुधीर आचार्य यांच्याकडून २० लाख रुपये कर्ज घेतल्याचे दाखवणारी एक बनावट प्रॉमिसरी नोट तयार करण्यात आल्याचे उघड झाले. या नोटवर जाधवांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचे उघड झाले. शिवाय जाधवांनी त्र्यंबकेश्वरातील (Trimbakeshwar) तळवाडे येथील स्टुडिओ अपार्टमेंट शाहीन विश्वास आत्तावर यांना विकली होती. या व्यवहारातील कागदपत्रांचा आधार घेऊन आचार्यसह इतर संशयितांनी ही मालमत्ता कर्जासाठी तारण ठेवल्याचे भासवले. त्यासाठी अक्षय जमदाडे आणि मंगेश दोंदे या व्यक्तींना बनावट साक्षीदार म्हणून दाखवण्यात आल्याचे जाधव यांनी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी (Indiranagar Police) गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक भूषण सोनार तपास करत आहेत.

न्यायालयाचीही दिशाभूल

या प्रकरणात संशयितांनी जाधव यांचीच नाही तर न्यायालयाचीही दिशाभूल केली. ज्या दिवशी जाधव बंगळुरूमध्ये असल्याचा दावा आचार्यने केला त्या दिवशी ते नाशिकमधील बटुकेश्वर महादेव मंदिरात एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित होते, याचे तांत्रिक पुरावे जाधव यांनी पोलिसांना सादर केले आहेत.

काय असतो मनी सूट?

मनी सूट हा एक दिवाणी खटला असून, थकीत रक्कम कायदेशीररीत्या वसूल करण्यासाठी तो न्यायालयात दाखल केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज किंवा व्यवहाराचे पैसे परत करत नाही, तेव्हा पैसे देणारा या कलमांतर्गत दाद मागतो. हा दावा सहसा प्रॉमिसरी नोट, लिखित करार किंवा बँक व्यवहारांच्या पुराव्यावर आधारित असतो. यामध्ये मुद्दल रकमेसह व्याजाचीही मागणी करता येते. प्रस्तुत प्रकरणात याच कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Case : कल्पनाची ‘माया’ अफाट; सात कोटींच्या व्यवहारांवर न्यायालयाचे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या (Fraud) आरोपाखाली अटकेत असलेला अशोक खरात याच्या गुन्ह्यात (Crime) आता त्याच्या पत्नीचा सहभाग अधिक स्पष्ट झाला...