Tuesday, November 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : दुर्दैवी घटना! वडील-मुलासह नातवाचा धरणात बुडून मृत्यू

Nashik News : दुर्दैवी घटना! वडील-मुलासह नातवाचा धरणात बुडून मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यातील कजवाडे (Kajwad) लगत असलेल्या सातवडी तलावात (Satvadi Lake) बुडून पिता-पुत्रासह नातवाचा अंत झाल्याची घटना रविवारी (दि.४) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

कजवाडे येथील हरी बाबू भोयेकर (२५) व भूषण रघुनाथ कन्नोर (८) हे मेंढ्यांना (Sheep) पाणी पाजण्यासाठी गावालगत असलेल्या सातवडी तलावावर गेले असता भूषणचा तोल जाऊन तो तलावात पडून बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी हरी भोयेकर यांनी देखील उडी मारली हे दोघे बुडू लागल्याचे लक्षात येताच जवळच असलेल्या बाबू गुठा भोवेकर (५५) यांनी देखील मुलगा व नातूला वाचविण्यासाठी तलावात उडी मारली.

पाण्यात (Water) बुडत असलेल्या या दोघांनी बाबू भोवेकर यांना पकडल्याने ते देखील त्यांच्याबरोबर पाण्यात बुडाले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी तलावाकडे धाव घेतली. मात्र, तिघेही पाण्यात बुडाले होते. ग्रामस्थांनी दोन ते अडीच तासाच्या परिश्रमानंतर तिघांचे मृतदेह (Dead Body) तलावाबाहेर काढले. पिता-पुत्रासह नातूचा देखील या दुर्दैवी घटनेत अंत झाल्याने कजवाडेसह काटवण परिसरात शोककळा पसरली आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : दोन गटांतील वादातून गोंधवणीत तुफान दगडफेक; कार जाळली

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur दशमेश चौक ते गोंधवणी रोड परिसरात दोन परस्पर विरोधी गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान दगडफेक करत एका चारचाकी वाहनाला आग लावून परिसरात...