Thursday, January 8, 2026
HomeनाशिकNashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून

Nashik Crime News : पंचवटीत पोलिस पुत्राचा निर्घृणपणे खून

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील पंचवटी परिसरातील (Panchvati Area) दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहासमोर सेवानिवृत्त पोलीस पुत्राचा निर्घृणपणे खून (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Accident News : ट्रक-मोटारसायकल अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर

YouTube video player

याबाबत अधिक माहिती अशी की, गगन प्रवीण कोकाटे (२५) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे (Youth) नाव आहे. आज पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली असून आर्थिक देवाणघेवाणीतून खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हे देखील वाचा : Rain News : नाशकात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची ‘जोर’धार; नागरिकांची तारांबळ

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, पंचवटी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे, पंचवटी पोलिस ठाण्याचे (Panchvati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले असून संशयित मारेकऱ्यांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik News : ‘स्ट्राँगरूम’ भोवती सशस्त्र कवच; मतदान-मतमोजणीदरम्यान त्रिस्तरीय सुरक्षा

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महापालिका निवडणुकीच्या मतदानाला अवये सात दिवस शिल्लक राहिल्याने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Commissioner Office) निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाच्या...