Friday, September 11, 2026
HomeनाशिकNashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनी धर्मांतर प्रकरणातील संशयित एजीएम चैनानीच्या...

Nashik Crime News : बहुराष्ट्रीय कंपनी धर्मांतर प्रकरणातील संशयित एजीएम चैनानीच्या कोठडीत वाढ; ७८ संशयास्पद ईमेल SIT च्या रडारवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मुंबईनाका हद्दीतील (Mumbai Naka Area) बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील (Case) संशयित असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) आश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीत (Police Custoy) नाशिक जिल्हा न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत दोन दिवसांची वाढ केली आहे. तपासादरम्यान समोर आलेले ७८ संशयास्पद ई-मेल्स आणि मुख्य संशयितांशी असलेले आर्थिक लागेबांधे यामुळे प्रकरणाचे गूढ गडद झाले आहे.

- Advertisement -

एसआयटीतील (SIT) तपासाधिकारी व सहाय्यक निरीक्षक गौतम सुरवाडे यांनी सोमवारी (दि. १३) न्यायालयात माहिती सादर केली. संशयित चैनानी आणि या गुन्ह्यातील मुख्य संशयित तौसिफ अत्तार यांच्यात गेल्या दोन वर्षांत ३८ वेळा संभाषण झाले आहे. तसेच संशयित दानिश शेख आणि रझा मेमन यांच्याशीही तिचे नियमित संपर्क होते. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीच्या सव्र्व्हरवरून चैनानीला पाठवण्यात आलेले ७८ ई-मेल्स आता तपासाच्या रडारवर आहेत. या ई-मेल्समध्ये पीडितांच्या तक्रारी होत्या की या गुन्ह्याचा कट, याचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाचा काळाबाजार; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग ताब्यात

न्यायालयातील (Court) युक्तिवादादरम्यान अभियोग कक्षाच्या सहायक संचालक किरण बेंडभर आणि सहायक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी चैनानीच्या भूमिकेवर बोट ठेवले. पीडित महिलेने जेव्हा विनयभंगाबाबत तक्रार केली, तेव्हा मदतीऐवजी चैनानीने “तुमको क्या हायलाईट होना है?” आणि “जाने दो, छोड दो” असे म्हणत पीडितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. एजीएम पदावरील जबाबदार महिला अधिकाऱ्याच्या या भूमिकेमुळेच इतर संशयितांची (Suspected) हिंमत वाढली आणि त्यांनी पीडितांचा अधिक छळ केल्याचा युक्तिवाद केला.

पॉश समिती सदस्यत्वावर प्रश्नचिन्ह

चैनानी यांचे वकील व्ही. आर. देशपांडे यांनी दावा केला की, त्या २०२६ पासून पॉश (लैंगिक छळ प्रतिबंधक समिती) च्या सदस्य आहेत. मात्र, पीडितेने २०२३ पासून छळ होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जर चैनानी समितीच्या सदस्य होत्या, तर त्यांनी वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केले? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी सध्या नाशिकरोड कारागृहात असून, निदा खान अजूनही पसार आहे. बुधवारी (दि. १५) एसआयटी इतर संशयितांच्या कोठडीची मागणी करणार आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime News : महिलेकडून तरुणाची हत्या; कोयत्याने केले सपासप वार

गुन्हा नोंदीपूर्वीच चौकशी?

२५ एप्रिल रोजी देवळाली कॅम्प पोलिसांत अत्याचारासह धर्मांतराच्या प्रयत्नाचा पहिला गुन्हा नोंद होताच नाशिक पोलिसांचे (Nashik Police) विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले. या पथकाने ३१ एप्रिल रोजी संबंधित कंपनीतील लैंगिक छळ प्रतिबंधक समिती (पॉश) सदस्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यावेळी कंपनीने चैनानी यांना नाशिक शहरात धाडले होते. त्यावेळी चैनानी यांची चौकशी झाली व जबाबदेखील नोंदवण्यात आला होता. मात्र, कोणताही गुन्हा नोंद होण्याबाबत चैनानी यांना कल्पना नव्हती. त्यामुळे अटकपूर्व जामीनासह इतर प्रयत्न त्यांनी केले नव्हते. त्यातच २ एप्रिल रोजी एका पीडितेच्या फिर्यादीवरुन चैनानी यांच्यावर गुन्हा नोंद होताच त्यांचा शोध सुरू झाला. चैनानी या पुण्यातील (Pune) त्यांच्या घरांमध्ये नसल्याचे पोलिसांना समजले. त्यांच्या पतीसह इतरांवर पाळत ठेवत गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चैनानी यांना ताब्यात घेतले होते.

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...