Wednesday, December 4, 2024
Homeक्राईमNashik Crime News : लुटारु चौकडी अटकेत; भद्रकाली पोलिसांची कारवाई

Nashik Crime News : लुटारु चौकडी अटकेत; भद्रकाली पोलिसांची कारवाई

मोबाईल हस्तगत

नाशिक | Nashik

घरात झोपलेल्या व्यक्तिंना मारहाण (Beating) करुन त्यांच्याकडील रोकड व मोबाइल बळजबरीने हिसकावून नेणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी (Bhadrakali Police) पकडले आहे. काझीगढी येथील शितळा देवी मंदिराजवळ २० ऑक्टोबरला हा प्रकार घडला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : जिल्ह्यातून ५७ अर्ज दाखल; खोसकरांच्या उमेदवारीसाठी भुजबळांची हजेरी

गोविंद पी. विश्वकर्मा व त्यांचे दोन रविवारी (दि.२०) रात्री घरात झोपलेले असताना चार ते पाच संशयित घरात शिरले. दांड्याने तिघांना मारहाण करीत ५ हजार रुपयांची रोकड व ६ हजार रुपयांचा मोबाइल (Mobile) हिसकावून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल निरीक्षक देशमुख, पथकाचे पवार, लक्ष्मण तपास करीत आहे. वरिष्ठ पोलीस गजेंद्र पाटील, श्रीनिवास विक्रम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध सहायक निरीक्षक सत्यवान हवालदार संदीप शेळके, ठेपणे आदींच्या पथकाने चौघांना पकडले.

हे देखील वाचा : Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळाली संधी?

दरम्यान, सागर अनिल कुमावत (३२), ऋषिकेश पगारे (२६), विकी नरेश शिंदे (२३) आणि विकी लक्ष्मण जोजे (२४, चौघे रा. काझीगढी) अशी पकडलेल्या संशयितांची (Suspected) नावे आहेत. पोलिसांनी (Police) संशयितांकडून जबरी लुटीतील मोबाइल जप्त केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या