Thursday, May 28, 2026
Homeक्राईमNashik Crime News : "माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, एखाद्या...

Nashik Crime News : “माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी…”; उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या नाशिक विभागात (Nashik division of ST Corporation) एक संतापजनक प्रकार समोर आला असून, एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने महिला सहकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchavati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसटी महामंडळाच्या आगार एकमध्ये खळबळ उडाली आहे.

विजय विश्वनाथ निकम (४५, रा. ओझर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. निकम हा एसटी महामंडळाच्या शिंगाडा तलाव, आगार क्र. १ (एन. डी. पटेलरोड) येथे सहायक वाहतूक अधीक्षक या पदावर कार्यरत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३६ वर्षीय विवाहित पीडित महिला (Women) बळी महाराज मंदिर चौफुली (पंचवटी) जवळील बायपास बुकिंग ऑफिस व भरारी पथकात कार्यरत आहे. एप्रिल २०२६ पासून ते ६ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. सहा मे रोजी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पीडिता तेथे कर्तव्य बजावत असताना संशयित विजय निकम तेथे आला.

त्याने पीडितेचा पाठलाग करुन, ‘तू गाडीत बस, एक चक्कर मारून येऊ, मला तुझ्याशी बोलायचे आहे.’ पीडित महिलेने त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर निकम गाडीतून खाली उतरला आणि त्याने जबरदस्तीने महिलेला चॉकलेट देण्याचा प्रयत्न केला. महिलेने पुन्हा नकार दिला असता त्याने तिचा उजवा हात पकडला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तू आवडतेस, एखाद्या दिवशी वेळ काढून माझ्या घरी ये’ असे म्हणत त्याने अश्लील संवाद साधून प्रेमाची मागणी केली. या कृत्यामुळे महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.

संशयित गैरहजर, पोलिसांकडून तपास

या छळाला कंटाळून अखेर पीडित महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित विजय निकम हा कायदेशीर कारवाईच्या भीतीने पसार झाला आहे. तो आपल्या कार्यालयातही हजर झाला नसल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करत आहेत.

ताज्या बातम्या

SET Exam 2026 – सेट परीक्षेची तारीख जाहीर

0
पुणे | प्रतिनिधी Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट परीक्षा)...